टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू

0
129
The Teacher Eligibility Test (TET) will be conducted by the Maharashtra State Examination Council on November 23, 2025.
Google search engine
पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी ) २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षण सेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ऑनलाइन अर्ज आणि प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबर पासून सुरू होणार असून उमेदवारांना ३ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरल्यानंतर १० नोव्हेंबर पासून २३ नोव्हेंबर पर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे.
परीक्षेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील 
  • पेपर १ : २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत
  • पेपर २ : २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

टीईटी परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अभ्यासक्रम, अर्ज प्रक्रिया, प्रवेशपत्र डाउनलोड यांसह आनुषंगिक माहिती परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahatet.in उपलब्ध करून दिली जाणार आहे. काही प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बदलांबाबतची माहिती संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षक निर्माण करण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जात असून, उमेदवारांनी वेळेत अर्ज करून तयारीस सुरुवात करावी. परीक्षा परिषदेच्या सूचनांचे पालन करणे आणि अधिकृत माहिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.
———————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here