spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeसामाजिकवयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी

वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी

राज्यातील पोलिस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील पोलिस भरती लांबणीवर गेल्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आधी कोरोना महामारी आणि त्यानंतर इतर काही अडथळ्यांमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वय भरतीसाठी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त झाले होते. विविध संघटनांनी आणि तरुणांनी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी लावून धरली होती. या मागणीकडे लक्ष देत राज्य सरकारने आता अशा उमेदवारांसाठी दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे.

गृह विभागाने १० सप्टेंबर २०२५ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला असून, २०२२ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेकडो नव्हे तर हजारो तरुणांचे पोलीस दलात सेवा देण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

सरकारचा पोलीस भरतीबाबतचा निर्णय
  • एकूण १५,६३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
  • पदे शंभर टक्के भरण्यात येणार आहेत.
  • जानेवारी २०२४ पासूनची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
  • वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती होणार 
  • पोलीस शिपाई – १२,३९९ जागा
  • पोलीस शिपाई चालक – २३४ जागा
  • बँड्समन – २५ जागा
  • सशस्त्र पोलीस शिपाई – २,३९३ जागा
  • कारागृह शिपाई – ५८० जागा
  • एकूण – १५,६३१  पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ही भरती प्रक्रिया केवळ नोकरीची नाही तर सेवाभावाने देशसेवा करण्याची संधी ठरणार आहे.
———————————————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments