मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
टी – २० विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी सुरु होणार असून या या स्पर्धेच्या तारखाही निश्चित होत आहेत. या स्पर्धेसाठी एकूण २० संघ उतरतील. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत १५ संघांनी आपली जागा निश्चित केली असून उर्वरित पाच संघांची निवड प्रादेशिक पात्रता स्पर्धांमधून होणार आहे.
भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, २०२६ मधील टी – २० विश्वचषक ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होऊ शकतो. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २० संघ उतरतील. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स आणि इटली. उर्वरित पाच संघांपैकी दोन आफ्रिका क्वालिफायरमधून तर उरलेले तीन आशिया आणि ईस्ट-एशिया पॅसिफिक क्वालिफायरमधून निश्चित होतील.
स्पर्धेचे सामने भारतामध्ये किमान पाच वेगवेगळ्या मैदानांवर तर श्रीलंकेत दोन मैदानांवर खेळवले जातील. अंतिम सामना कुठे होणार हे मात्र पाकिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून असेल. जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला, तर कोलंबो येथे सामना रंगेल. नाही तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.
फॉरमॅट यावेळीसुद्धा २०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या विश्वचषकाप्रमाणेच असेल.२० संघांचे चार गट तयार होतील आणि प्रत्येक गटातून दोन संघ सुपर-८ फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर दोन गटांत विभागलेल्या आठ संघांमधून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि तेथून अंतिम लढत रंगेल.
—————————————————————————————————