आज म्हणजे 11 एप्रिल ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी अनेक देशावर लागू केलेले ट्रेड टॅरीफ़चे नवीन दर 90 दिवसानी लागू होतील असे सांगितले आहे. त्यामुळे अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला.परंतु चीनची यातुनही सुटका नाही. जगातील या सुपर पॉवर्स-अमेरिका व चीन मधील स्पर्धा 2018-19 मधेच सुरु झाली. अमेरिका व चीन यातील हे व्यापार युद्ध डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या सत्तेवर आल्यावर त्यानी इतर देशावर ‘ट्रेड टॅरीफ’ लादून व्यापक केले. चीनशी अमेरिकेचे व्यापारी युध्द सुरु होण्याआधी अमेरिका चीन कडे जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पहात होते व चीन मधील अमेरिकेची गुंतवणूकही वाढली होती. एवढेच काय, अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी चीन मधील स्वस्त लेबर चार्जेसमुळे व अवाढव्य मार्केटमध्ये तेथे आपले कारखानेही सुरु केले होते. चीन जसे व्यापारात अग्रेसर होत गेले तसे अमेरिकी सरकार मधे अस्वस्थता वाढू लागली. स्पर्धा जेव्हा तीव्र होउ लागली तेव्हा चीन मधिल कंपन्यांना मिळणा-या सबसिडीचा व चीन करत असलेल्या अमेरिकन तंत्रज्ञानाच्या चो-या व हेरगिरी आदी मुद्दे उपस्थित होउ लागले. छूप्या सबसिडी मुळे चीनच्या कमी किमतीच्या उत्पादनासह स्पर्धा करताना अमेरिकेची दमछाक होउ लागली. नंतर अमेरिकेच्या संसदेतुन चीन हाच अमेरिकेचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे असे जाहीर केले गेले. त्या वेळी ही ट्रम्प हेच सत्तेत होते. ट्र्म्प यांनी पुन्हा सत्तेवर आल्यापासुन चीनला पुन्हा लक्ष्य करुन चीनच्या अमेरिकेत येणा-या उत्पादनावर आयात कर मोठ्या प्रमाणात वाढवले. हे प्रमाण 54%आयात शुल्कावर गेले. त्यामुळे चीनसह चीनमधे उत्पादन करणा-या अमेरिकन कंपन्याची उत्पादनेही या पट्ट्यात सापडली. आता ही उत्पादने त्यामुळे चीन मध्ये न करता भारतात करण्याचा कल वाढला. भारतावरही आयात शुल्क आहेच पण चीनच्या तुलनेत फार कमीआहे.
त्यामुळे प्रथम चीन मधे उत्पादन करत असलेल्या अॅपल आयफोन सारख्या नामांकीत कम्पनीने भारतातही चेन्नई मधे फॉक्सकॉन व टाटा सह आयफोनचे उत्पादन सुरु केले होते. आता चेन्नई मधून अॅपल 600 टन येवढ्या प्रचंड प्रमाणात आयफोन एअर लिफ्ट करत आहे. अॅपल आयफोन मोबाइलच्या स्वरूपात याचा आकडा थोडाथोडका नव्हे तर 15 लाख एवढा आहे. अॅपल ही 1976 मधिल कंपनी. स्टीव्ह जॉब्ज,रीचर्ड वेन व स्टिव्ह वॉझ्निअॅक यानी स्थापन केलेली. कन्झ्युमर्स ईलेक्ट्रॉनिक्स मधे अग्रेसर असणारी कम्पनी आय फोन,आय पॅड, मॅक, अॅपल वॉचेस व सॉफ्टवेअर साठी जगात प्रसिद्ध आहे.
आता अमेरीकेनेच लागू केलेल्या चीन वरील आयात शूल्काचा फटका अमेरीकन कंपन्यांनाच बसतोय हा खासा न्याय एकंदरित अमेरिकन राजकारणावर व व्यापारी नितीवर लख्ख प्रकाश टाकणारा आहे. या मुळे चीन मधे उत्पादन करणाया अमेरिकन कंपन्यामधे पळापळ सुरु झाली आहे. एकट्या अॅपलनेच 3 दिवसात अॅपल आय फोन ने खचाखच भरलेली 5 विमाने भारतातुन अमेरिकेस रवाना केली आहेत. भारत व चीन मधिल आय फोन्स तातडीने अमेरिकेत स्टोअर केल्यानंतरच अॅपल ला स्वस्थता येइल. कारण सध्या आय फ़ोनचे भारतातील दर अॅपल वाढवणे अवघड आहे व कम्पनीची तशी कोणतीही पॉलीसी ही नाही. त्यामुळे हा उपदव्याप करणे शिवाय पर्याय राहीला नाही.
तसेच अमेरिकेने भारतावर लावलेला आयात शुल्काचा दर हा 28% तर चीन च्या उत्पादनावरील 54% त्यामुळे तब्बल 26%चा फरक कोणती कंपनी सहन करणार आहे? त्यामुळे यातिल अनेक कंपन्या भारतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अंतरराष्ट्रीय व्यापार युध्दात भारतास फायदा मिळू शकतो.
चीनने ही सर्व परिस्थिती हेरुन भारताकडे मैत्रीचा हात पुढे केलाआहे. अमेरिकेचे निर्बंध असेच चालू राहीले तर चीनला आपली उत्पादने निर्यात करण्यासाठी भारत हा बेस्ट पर्याय असेल. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार प्रचंड आहे. तो भारताकडे येऊ शकत असला तरी भारत यात चीन वर विश्वास ठेवणे अवघड आहे. व्यापारी संबंधापुरते हे नाते ठीक आहे. यातून पुन्हा अमेरिकेची नाराजी कोण ओढवून घेणार? त्यामुळे भारतास या सर्व घडामोडीवर बारकाइने लक्ष ठेवून आपल्या देशाचे हीत लक्षात घेवून सावधानतेने पावले उचलणे गरजेचेआहे.






