spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeआंतरराष्ट्रीयआशिया कप-२०२५ चा थरार उद्यापासून

आशिया कप-२०२५ चा थरार उद्यापासून

ग्रुप स्टेजपासून फायनलपर्यंत संपूर्ण वेळापत्रक

दुबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

आशिया कप -२०२५ ला मंगळवार ९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी रंगतदार लढतींचा कार्यक्रम तयार झाला आहे. स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी झाले आहेत आणि त्यांना ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.

ग्रुप ए आणि ग्रुप बी
  • ग्रुप ए : भारत, पाकिस्तान, युएई, ओमान
  • ग्रुप बी : श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग
ग्रुप स्टेजमध्ये भारताला पाकिस्तान शिवाय युएई आणि ओमान विरुद्ध खेळावं लागणार आहे. ग्रुप ए मधून टॉप-२ संघ सुपर-४ स्टेजसाठी पात्र ठरणार आहेत. भारताने त्याच्या ग्रुपमधील ३ पैकी किमान २ सामने जिंकले तरी पुढच्या फेरीत प्रवेश मिळवू शकतो.
ग्रुप बीमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात काटेकोर स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सुपर-४ फेरीत दोन्ही गटांतील टॉप-२ संघ समोरासमोर भिडतील. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर-४ मध्ये सामना होण्याचीही दाट शक्यता आहे.
फायनल कुठे आणि कधी – सुपर- ४ स्टेजमध्ये सर्वाधिक पॉइंट्स मिळवणाऱ्या टॉप- २ संघांमध्ये २८ सप्टेंबरला फायनल खेळवली जाणार आहे.
वेळ व प्रक्षेपण
आशिया कपचे सर्व सामने अबु धाबी आणि दुबई येथे खेळवले जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार प्रत्येक सामना रात्री ८ वाजता सुरू होईल. सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील, तसेच सोनी लिव्हवर लाईव्ह स्ट्रीमिंगही उपलब्ध असेल.
आशिया कप-२०२५ – वेळापत्रक
ग्रुप स्टेज
  • ९ सप्टेंबर – अफगाणिस्तान vs हाँगकाँग
  • १० सप्टेंबर – भारत vs युएई
  • ११ सप्टेंबर – बांगलादेश vs हाँगकाँग
  • १२ सप्टेंबर – पाकिस्तान vs ओमान
  • १३ सप्टेंबर – बांगलादेश vs श्रीलंका
  • १४ सप्टेंबर – भारत vs पाकिस्तान
  • १५ सप्टेंबर – युएई vs ओमान
  • १५ सप्टेंबर – श्रीलंका vs हाँगकाँग
  • १६ सप्टेंबर – बांगलादेश vs अफगाणिस्तान
  • १७ सप्टेंबर – पाकिस्तान vs युएई
  • १९ सप्टेंबर – भारत vs ओमान
सुपर- ४ स्टेज
  • २० सप्टेंबर – B1 vs B2
  • २१ सप्टेंबर – A1 vs A2
  • २३ सप्टेंबर – A2 vs B1
  • २४ सप्टेंबर – A1 vs B2
  • २५ सप्टेंबर – A2 vs B2
  • २६ सप्टेंबर – A1 vs B1
फायनल
  • २८ सप्टेंबर – अंतिम सामना
या स्पर्धेमुळे क्रिकेट चाहत्यांना दर्जेदार सामने आणि रोमांचक लढतींचा आस्वाद घेता येणार आहे. भारत, पाकिस्तान यांसारखे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ तसेच इतर संघांचे चुरशीचे सामने आशिया कप-२०२५ ला संस्मरणीय बनवणार आहेत.
——————————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments