कोल्हापूर : ता. १०
भारतातील शेती मध्ये विशेषतः ग्रामीण भागात नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शेती उत्पादनात आमूलाग्र बदल घडत आहेत. देशातील अनेक संस्था सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहेत. परिणामी, ग्रामीण भारताला सक्षम बनविण्याबरोबर लाखों लोकांचे जीवनमान यामुळे उंचावले आहे.
सेंद्रिय शेतीच्या नवनवीन पद्धती विकसित केल्या जात आहेत. उत्पादन खर्चात बचत होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. यावर आधारित नवं नवीन उद्योग उभे राहत आहेत. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
अलीकडे शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक आपत्ती, कर्जाचा बोजा, अपुरी आधुनिक साधने, बाजारपेठेतील अस्थिरता, शाश्वत शेतीसाठी उपाय, सिंचनाची सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, सरकारने हमीभाव सुनिश्चित करणे अशी खडतर आव्हाने असून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारल्याशिवाय देशाचा खरा विकास होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना समर्थन देणे म्हणजे देशाच्या भविष्याला बळकट करणे होय. यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व थरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
हे आवश्यक आहे –
१) सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक प्रशिक्षण व संसाधने सहजरीत्या उपलब्ध करणे
2) शेतकरी व लघु उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक मदत देणे
३) स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण
४) स्वावलंबी व आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे
अशा काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास सेंद्रिय शेतीचा वापर वाढेल . सेंद्रिय शेतीतील उत्पादने ही लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून त्याचा वापर वाढल्यास ग्रामीण भारताचे आरोग्य व जीवनमान ही बदलू शकेल.