उघडीपीमुळे गणेशोत्सवास आणखी प्रेरणा

0
94
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

गणेशोत्सवाचे देखावे पाहण्याची आणि महाप्रसादाची धांदल उडाली आहे. कोल्हापुरात पावसानेही चांगलीच उघडीप दिली आहे. यामुळे या उत्साहात कोणतीही विघ्ने न येता अत्यंत आनंदात हा उत्सव पार पडत आहे. आज दिवसभर उन आहे.  गणेशोत्सवाचाही उद्या शेवटचा दिवस. देखावे पाहण्यासठी फक्त एकच रात्र शिल्लक आहे. म्हणून आज रात्रभर देखावे पाहण्यासाठी गर्दीचा महापूर उसळेल. हवामान विभागाने आज दिवसभरात कोल्हापुरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्येसुद्धा  पाऊस जोर धरताना दिसणार आहे. प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये पावसामुळं पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर राजस्थानच्या पूर्वेकडे असणाऱ्या धुंगारपूर आणि बंसवरा इथंसुद्धा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमधघ्ये महाराष्ट्राचं शेजारी राज्य असणाऱ्या गुजरातमधील काही जिल्ह्यांमध्ये, नर्मदा, तापी, नवसारी आणि वलसाड या भागांना जोरदार इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील पश्चिमेकडे असणाऱ्या धार, अलिराजपूर, भरवानी आणि इंदूर या राद्यांमध्येही  पुराचा धोका सांगण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्य़ामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्यानं राज्याच्या कोकण आणि घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसाळी ढगांची दाटी होऊन जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील काही भाग मात्र या स्थितीस अपवाद ठरणार असून, तिथं मात्र पाऊस उघडीप देताना दिसणार आहे.

————————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here