‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ सिनेमाचा लुक व्हायरल

साधूच्या वेशात महेश मांजरेकर

0
110
The much-awaited film in the Marathi cinema industry, 'Punha Shivaji Raje Bhosale', is coming to the audience and Mahesh Manjrekar's look in the guise of a sadhu from this film has recently come to light.
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठी सिनेसृष्टीतील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ पुन्हा शिवाजी राजे भोसले ’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमातून महेश मांजरेकरांचा साधूच्या वेशातील लुक नुकताच समोर आला आहे. केसांच्या मोठ्या जटा, चेहऱ्यावर भस्म, गळ्यातील रुद्राक्षाच्या माळा आणि नारंगी वस्त्र अशा वेशात ते दिसत असून सोशल मीडियावर हा लुक चांगलाच व्हायरल झाला आहे.

या लुकची पहिली झलक सिनेमातील पहिल्याच गाण्यातून प्रेक्षकांसमोर आली. नुकतंच रिलीज झालेलं ‘दुर्गे दुर्घट भारी’ हे गीत रसिकांच्या मनात भक्तीचा आणि उर्जेचा संचार करत आहे. पारंपरिक स्तोत्राला आधुनिक संगीताची छटा देत या गीताला नवा आयाम देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गाण्याद्वारे महेश मांजरेकरांनी प्रथमच संगीतकार म्हणून पदार्पण केलं आहे.

शंकर महादेवन यांच्या प्रभावी आवाजाने गाण्याला दैवी उंची प्राप्त झाली आहे. ढोल-ताशांचा दणदणाट ( वरद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, रुंल सावंत ) देवीच्या जयघोषाची अनुभूती देतो. आयडी राव यांच्या हॉर्न्सनी गीताला भव्यता दिली असून यशराज स्टुडिओमधील विजय दयाल यांच्या मिक्सिंग आणि मास्टरिंगमुळे हे गीत आणखी प्रभावी बनलं आहे.

‘दुर्गे दुर्घट भारी’ हे गीत केवळ गाणं नसून भक्तिरसाचा झरा ठरत असून सध्या प्रत्येक घराघरात आणि मनामनात देवीची आराधना गुंजवत आहे. यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

——————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here