एआय व जपानच्या मदतीने महाराष्ट्रातील शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार: मुख्यमंत्री फडणवीस

0
156
Google search engine

भारत शेतीप्रधान देश आहे व आपल्या देशातील 70% लोकसंख्येचा शेती हाच उत्पन्नाचा स्त्रोत आहे हेआपण अनेक वर्षे ऐकत, वाचत आलो आहोत. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या,सुलतानी, किंवा नैसर्गिक आसमानी आपत्ती मुळे शेतीचे होणारे नुकसान आपणा सर्वानाच अस्वस्थ करते.त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती सुधारुन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्याच्या प्रयत्नांची तातडीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकार जपानच्या तंत्रज्ञानाने शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नातआहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जपानचे M2 लॅबो कंपनीचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

भारत व जपान मधिल कुशल शेतीसाठी काम करणा-या संस्थाना एकत्र करुन, एआय चा वापर वाढवून शेतीच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे हे याचे उद्दिष्ट आहे.जपानी तंत्रज्ञान भारतीय शेतीच्या क्षेत्रात कृत्रिम बुदधीच्या सहाय्याने कोट्यावधी भारतीय शेतकऱ्यांना मदत करु शकतात.मातीचे पुनुरुज्जीवन,आदर्श शेतीची मॉडेल्स, हरीत ग्रुह तंत्रज्ञान यावर महाराष्ट्र सरकार M2 लॅबोसह काम करेल. शेती उत्पादनाच्या विपणनातील अनिष्ट पध्दतीतून सुटका करुन घेण्यासाठी शेतक-यां ना सामर्थ्य प्रदान केले जाइल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

याप्रसन्गी लॅबोचे मुख्य कार्यकारी अधिकारी युरीको केटो,समीर खाले, मित्र संघटनेचे अध्यक्ष प्रसुन अग्रवाल, लॅबो भारतशाखेचे डायरेक्टर देवांग ओझा आदी उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here