राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या मान्यतेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभागांची नवी रचना निश्चित करण्यासाठी प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
नगरविकास विभागाच्या आदेशान्वये महानगरपालिका आयुक्तांनी ही अधिसूचना राजपत्रात जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार आज अधिसूचना प्रसिद्ध झाली असून नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.
अधिसूचनेची प्रमुख वैशिष्ट्ये :
एकूण नगरसेवक सदस्यांची संख्या : ८१
चार सदस्यीय प्रभागांची संख्या : १९
पाच सदस्यीय प्रभागांची संख्या : ०१
एकूण प्रभागांची संख्या : २०
नागरिकांना या प्रारुप प्रभाग रचनेबाबत हरकती अथवा सूचना १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांचेकडे सादर करता येतील. या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ही अधिसूचना कोल्हापूर महानगरपालिकेच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागू राहणार असून प्रभागांची संख्या व व्याप्ती अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये निश्चित करण्यात आली आहे.