डिजिटल युगामुळे कामकाजात पारदर्शकता

ग्रामपंचायत साठी केंद्र सरकारचे मेरी पंचायत अॅप

0
114
Mary Panchayat App
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने मेरी पंचायत अॅप सुरू केले आहे. डिजीटल युगामुळे गावकऱ्यांना थेट माहिती मिळवून देण्याची गरज यामुळे शक्य झाली आहे.. या अॅपच्या मदतीने गावातील विकासकामांपासून आर्थिक घडामोडींपर्यंत सर्व माहिती आता एका क्लिकवर ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे.
पारदर्शक कामकाज
केंद्र व राज्य सरकार कडून थेट निधी ग्रामपंचायतींना मिळतो. गावच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला हा निधी नेमका कुठे खर्च होतो, त्या अंतर्गत कोणती कामं सुरू आहेत, किती खर्च झाला आहे, याची माहिती साधारणपणे ग्रामस्थांना सहजा सहजी मिळत नाही. यातून ग्रामस्थांकडून शंका घेतल्या जातात. कामकाजा बाबत तक्रारी निर्माण होतात. यासाठी ‘मेरी पंचायत’ अॅप हीच पोकळी भरून काढणार असून ग्रामपंचायतींचे सर्व व्यवहार आता ग्रामस्थांसमोर सहजपणे कळणार आहेत.परिणामी कामकाजात पारदर्शकता येणार आहे.
‘मेरी पंचायत’ अॅप – ग्रामस्थांना खालीलप्रमाणे महत्त्वाची माहिती मिळेल.
  • आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांची संपूर्ण यादी
  • स्थापन झालेल्या विविध समित्या व त्यांचे अध्यक्ष
  • ग्रामपंचायतीने दिलेल्या नवीन सूचना व नोटीसेस
  • गावाला मिळालेलं सरकारी अनुदान व त्याचा वापर 
  • कोणत्या योजनेतून कोणती विकासकामं सुरू आहेत याची माहिती
  • ग्रामपंचायतीची बँक खाती आणि खर्चाचे तपशील
  • पाण्याचे स्रोत, नळजोडण्या आणि सुविधा यांची नोंद
  • प्रत्येक कामासाठी झालेला खर्च आणि शिल्लक निधीचा हिशोब
ग्रामस्थांचा सहभाग
सरकारच्या या महत्त्वाच्या अॅपची खासियत म्हणजे ग्रामस्थांना फोटो अपलोड करून अभिप्राय नोंदवता येणार आहे. तशी सुविधा यात केली आहे. एखादं काम निकृष्ट दर्जाचं झालं असेल किंवा चांगलं काम झालं असेल, तर त्याचा फोटो टाकून सूचना किंवा तक्रार करता येते. त्यामुळे स्थानिक पातळीवर जबाबदारीची भावना वाढेल आणि चांगल्या प्रशासनाला चालना मिळेल.
‘मेरी पंचायत’ अॅप मध्ये ग्रामपंचायतीचा आर्थिक हिशोब आता सर्वांसाठी खुला झाल्याने हा सर्वात मोठा फायदा आहे. कोणत्या कामासाठी किती रक्कम मंजूर झाली, प्रत्यक्षात किती खर्च झाला आणि अजून किती शिल्लक आहे, हे सर्व तपशील ग्रामस्थांना या अॅपच्या माध्यमातून मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे अनावश्यक गैरसमज दूर होऊन भ्रष्टाचारालाही आळा बसेल. तसेच प्रत्येक काम पारदर्शक व वेळेवर होईल.
——————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here