कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आपले गणपती बाप्पा सात दिवस घरी राहून परत गावाला जात आहेत. त्यांच्या सात दिवसाच्या मुक्कामात घरात आनंदी आनंद होता. उत्साह होता. आपला सखा गणपतीबाप्पा आपल्यामध्ये वर्षभर पुरेल इतकी उर्जा निर्माण करून जात आहे. गणपती बाप्पा सुखकर्ता दु:खहर्ता आहे. सात दिवसात बाप्पाने सर्वांच्यावर प्रेमाची उधळण केली. यामुळेच तर बाप्पा जाताना वाईट वाटते आम्हाला. कोल्हापुरात बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम कुंडाची सोय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रशासनाने केली असून याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गणपती बाप्पा बुद्धीचे दैवत आहे. बाप्पा देव आहे मात्र त्याचे देवपण जाणवतच नाही. तो आपला भाऊ, मित्र, सखा आहे असेच वाटते. म्हणून तर बाप्पाला निरोप देताना वाईट वाटते आम्हाला. बाप्पाला आज निरोप द्यायचा आहे. तो परत पुढच्या वर्षी येणार आहे. बाप्पाला आता सोडायचे आहे, मात्र नदी, तलावात, समुद्रात वा अन्य पाणवठ्यात सोडायचे नाही. कृत्रिम कुंडात बाप्पाला विसर्जित करायचे आहे.
कोल्हापुरात तर गेल्या दहा वर्षापासून तशी प्रथाच पडलेली आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन ही कोल्हापूरच्या जनतेने पाडलेली एक प्रथाच आहे. या प्रथेचे अनुकरन ह्ळू हळू संपूर्ण देशभरात होत आहे. मागील सात वर्षापूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरात राबविल्या जात असलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन या उपक्रमाचे ‘मन कि बात’ या कार्यक्रमात कौतुक केले. इतकेच नव्हे तर हा उपक्रम संपूर्ण देशभर राबवावा असे आवाहनही मोदी यांनी जनतेला केले.
पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी महापालिका व जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली आहे. यानंतर विसर्जित गणेशमूर्तींचे पुन्हा एकदा सुरक्षितरीत्या विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी ट्रॅक्टर ट्राॅलींची सोय करण्यात आली आहे, तसेच निर्माल्य संकलनाची देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे,
कोल्हापूर शहरात १६० गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंड
– शहरात सर्व प्रभागात १६० गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडाची व्यवस्था केली आहे. भक्तांच्या मदतीलाअडीच ह्जाराहाहून अधिक कर्मचारी दोन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत.
-
इराणी खान येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयचलित यंत्र बसवले असून गणेशमूर्ती संकलनासाठी २०५ टॅम्पो, ४८० हमाल, ७ जेसीबी, ७ डम्पर, ८ ट्रॅक्टर, ४ पाण्याचे टॅंकर, २ बूम, ५ रुग्णवाहिका व ५ साधे तराफे, यावर्षी पहिल्यांदाच १ क्रेन अशी यंत्रणा सज्ज आहे.
-
अग्निशमन दलाचे जवानही विसर्स्थजन स्थळी सुरक्षिततेसाठी साधन सामग्रीसह तैनात आहेत. विसर्जन ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
-
-निर्माल्य गोळा करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या नियंत्रनाखाली कर्मचारी नियुक्त केले असून, संकलित निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, बावडा,दुधाळी, आयसोलेशन हॉस्पिटल येथे पाठवले जाणार आहे.



