The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has extended the deadline for filling Form No. 17, and now students will be able to fill the form by September 15, 2025.
पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
दहावी ( SSC ) आणि बारावी ( HSC ) बोर्डाची परीक्षा खासगी पद्धतीने देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फॉर्म क्रमांक १७ भरण्याची अंतिम मुदत वाढवली असून, आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत. यापूर्वी ही मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत होती.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या एसएससी व एचएससी बोर्डाच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी फॉर्म क्रमांक १७ द्वारे केली जाते. अनेक विद्यार्थी अजूनही फॉर्म भरू शकले नव्हते. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या हेतूने मंडळाने मुदतवाढ जाहीर केली आहे.
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत किंवा दुय्यम प्रत) व प्रतिज्ञापत्र
आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
फी संरचना :
नोंदणी शुल्क : ₹ १११०
प्रक्रिया शुल्क : ₹ १००
विलंब शुल्क : ₹ १०० ( अंतिम तारखेनंतर भरल्यास लागू )
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरwww.mahahsscboard.inजाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढणे अनिवार्य आहे.
फॉर्म नं. १७ कोण भरू शकतात ?
नियमित शाळेत जाऊ न शकणारे विद्यार्थी
शिक्षण अर्धवट राहिलेले विद्यार्थी
खासगी पद्धतीने शिक्षण घेऊन परीक्षा द्यायची इच्छा असणारे विद्यार्थी
या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, उर्वरित विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबरपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.