spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeअध्यात्म‘श्री गणेशा आरोग्याचा २०२५’ अभियान

‘श्री गणेशा आरोग्याचा २०२५’ अभियान

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ‘ श्री गणेशा आरोग्याचा २०२५’ या अनोख्या अभियानातून समाजात आरोग्य जागृती आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन येत आहेत. हे अभियान गणेशोत्सवाला सामाजिक परिमाण देणार आहे. 
भारताला सण-उत्सवांचा देश म्हणून ओळखले जाते, तर कोल्हापूर हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समाजसेवेचा वारसा जपणारा जिल्हा आहे. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा सण असून, विघ्नहर्ता श्री गणेशाच्या भक्तीतून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची येथील परंपरा आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान यंदा या परंपरेला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात ‘आरोग्य हेच खरे धन’ हे तत्त्व लोक विसरत चालले आहेत. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. ‘सावध रहा अन् सुखी रहा’ या तत्त्वानुसार, या अभियानातून ‘उपचारापेक्षा प्रतिबंध हाच श्रेष्ठ’ ही भावना रुजवली जाणार आहे.
विविध उपक्रमांची रेलचेल
अभियानांतर्गत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांमध्ये रक्तदाब, शुगर, डोळे आणि दंत तपासणी केली जाणार आहे. ‘स्वच्छतेतच खरे सौंदर्य आहे’ या संदेशासह गणेश मंडप आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या जाणार आहेत. याशिवाय, प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून आहारशास्त्र, व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्याविषयी व्याख्याने आयोजित केली जाणार असून, सजीव देखाव्यांद्वारे जनजागृती केली जाईल.

रक्तदान : जीवनदानाचा संकल्प

रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेतून रक्तदान शिबिरांचे आयोजनही या अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. या उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढेल आणि स्वच्छता, व्यायाम, संतुलित आहार यांसारख्या सवयींमुळे निरोगी वातावरण निर्माण होईल.
लोकमान्य टिळकांचे स्वप्न साकारणार
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला समाज परिवर्तनाचे साधन बनवण्याची संकल्पना मांडली होती. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान शासनाच्या आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून ही संकल्पना साकारेल. ‘सुखी आणि आरोगी तोच खरा श्रीमंत’ या विचाराने प्रेरित हे अभियान समाजाला निरोगी जीवनाचा संदेश देणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव श्री गणेशाच्या आशीर्वादाने आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन येत आहे. या अभियानात अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. चंद्रकांत परुळेकर, कक्ष प्रमुख, कोल्हापूर यांनी केले आहे. सहभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा.
————————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments