नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे आज ( १९ ऑगस्ट ) ‘ आदी कर्मयोगी अभियान ’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आदिवासी पाड्यातील नागरिकांना सक्षम बनवणे, स्थानिक नेतृत्त्वाला संधी मिळवून देणे आणि शासन अधिक लोकाभिमुख व उत्तरदायी करण्याचा या अभियानामागचा हेतू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृरदर्शी नेतृत्त्वाखाली या उपक्रमाला सुरुवात झाली असून सेवा, संकल्प आणि समर्पण हा या मोहिमेचा मूलमंत्र आहे.
मुख्य उद्देश
या अभियानाचे ध्येय ‘एक लाख आदिवासी गावे – व्हिजन २०३०’ तयार करणे असून, आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठी ठोस योजना आणि गुंतवणूक धोरण राबविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी –
-
५५० जिल्हे, ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तब्बल २० लाख परिवर्तन घडवणाऱ्या नेत्यांचे नेटवर्क उभारले जाईल.
-
गावपातळीवर शासकीय अधिकारी आणि स्थानिक समुदाय एकत्र येऊन आदिवासी गाव व्हिजन २०३० तयार करतील.
-
हे व्हिजन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असेल.
अभियानातून होणारे काम
-
प्रत्येक आदिवासीबहुल गावात शासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ दर पंधरा दिवसांत एक-दोन तास बैठक घेऊन समस्या सोडवतील.
-
युवकांना करिअर व विकासाबाबत मार्गदर्शन केले जाईल.
-
शिक्षक, डॉक्टर आणि विविध सेवक वर्ग आदिवासी समुदायाला प्रेरणा देतील. अशा व्यक्तींना आदी सहयोगी म्हटले जाईल.
-
स्वयं सहायता गट, एनआरएलएम सदस्य, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नेते आणि महिला यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला जाईल.
-
युवक व महिला यांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी विशेष क्षमता निर्मिती कार्यक्रम राबवले जातील.