कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने “अभिजात मराठी काव्यलेखन स्पर्धा – २०२५” जाहीर करण्यात आली आहे. ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी सर्व साहित्यप्रेमींना आवाहन करण्यात आले आहे. मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी अनेक साहित्यिक सतत लेखन करत असतात. त्यांच्या अंगभूत काव्यगुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच नवोदित कवींच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी परिषदेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षी परिषदेच्या वतीने अशा विविध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून त्यास साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. अभिजात काव्य लेखन स्पर्धा हा परिषदेच्या नव्या उपक्रमांचा एक भाग असून यामध्ये मराठी काव्य परंपरेचा गौरव करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. इच्छुक साहित्यिकांनी ठरावीक मुदतीत आपली काव्यरचना सादर करावयाची असून लवकरच स्पर्धेचे नियम, अटी व पारितोषिकांची माहिती परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे विषय –
1️⃣ मराठीची गोडी – संस्कृतीची ओढी
2️⃣ निसर्ग जपू, जीवन फुलवू
कोणत्याही काव्यप्रकारात ५ कडव्यांची कविता अपेक्षित असून प्रत्येक स्पर्धकाने स्वतःचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करून कविता सादर करावी. कविता पाठविण्याची अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०२५, रात्री १२.०० वाजेपर्यंत आहे. कविता या दिलेल्या WhatsApp ग्रुपवर स्वीकारल्या जाणार आहेत
स्पर्धेचा WhatsApp ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/FJCTYUpuYP5IEFUAq3Qlg8?mode=ac_t
संपर्क :
-
रवींद्र पाटील – सीमाकवी – ९५९१९२९३२५
-
संजय साबळे – जिल्हाध्यक्ष – ९४२०९७३१५१
-
मनीषा डांगे – महिला जिल्हाध्यक्षा – ९६०४७३८५२७
साहित्यप्रेमी, कवी व रसिकांना या काव्ययज्ञात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—————————————————————————————————-



