कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारताने अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात देशात १८,९०० हून अधिक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामुळे भारत हा अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक ठरला आहे.
यु टयुब वरील एका व्हिडिओद्वारे ही माहिती देताना नड्डा म्हणाले की, “ही फक्त आकड्यांची बाब नाही, तर हे त्या हजारो रुग्णांच्या नव्या जीवनाचे प्रतीक आहे, ज्यांना या प्रत्यारोपणांमुळे जीवनदान मिळाले आहे. नड्डा यांनी नागरिकांना अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करत सांगितले की, अवयवदान हे सर्वात मोठं दान आहे. आपण एखाद्याला मृत्यूपासून वाचवू शकतो.”
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये भारताने प्रत्यारोपणांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवली असून यामध्ये किडनी, यकृत (लिव्हर), हृदय, फुफ्फुसे आणि इतर अवयवांचा समावेश आहे. देशभरात अवयवदानाबाबत जनजागृती वाढल्याने आणि अधिक सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने ही कामगिरी शक्य झाली आहे.
केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था’ (NOTTO) च्या माध्यमातून एक संगठित प्रणाली उभारली आहे, ज्यामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया पारदर्शक व जलद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी १८,९०० हून अधिक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या, ज्यामुळे भारताने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तेलंगणा राज्याला भारतातील सर्वात जास्त अवयव दान दर (organ donation rate) असल्याबद्दल ओळखले जाते. भारत अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
————————————————————————————————



