नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्ड कप – २०२५ केवळ ५० दिवसांवर आले असून क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक लढतींची मेजवानी सुरू होणार आहे. यंदा हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत आहे. ३० सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील उद्घाटन सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल, तर २ नोव्हेंबर रोजी कोलंबो किंवा बेंगळुरू येथे भव्य अंतिम सामना खेळला जाईल.
स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी असून, राउंड-रॉबिन पद्धतीने प्रत्येक संघ इतर सर्व संघांविरुद्ध एकदा सामना खेळेल. गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरी गाठतील. सर्वाधिक चर्चेत असलेला भारत-पाकिस्तान सामना ५ ऑक्टोबर रोजी कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे.
महिला वर्ल्ड कप-२०२५ संपूर्ण वेळापत्रक
-
३० सप्टेंबर : भारत विरुद्ध श्रीलंका – बेंगळुरू
-
१ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – इंदूर
-
२ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
-
३ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – बेंगळुरू
-
४ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
-
५ ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
-
६ ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – इंदूर
-
७ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध बांगलादेश – गुवाहाटी
-
८ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
-
९ ऑक्टोबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – विशाखापट्टणम
-
१० ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश – विशाखापट्टणम
-
११ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका – गुवाहाटी
-
१२ ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – विशाखापट्टणम
-
१३ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश – विशाखापट्टणम
-
१४ ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
-
१५ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
-
१६ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – विशाखापट्टणम
-
१७ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
-
१८ ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
-
१९ ऑक्टोबर : भारत विरुद्ध इंग्लंड – इंदूर
-
२० ऑक्टोबर : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – कोलंबो
-
२१ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
-
२२ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – इंदूर
-
२३ ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड – गुवाहाटी
-
२४ ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
-
२५ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – इंदूर
-
२६ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – गुवाहाटी
-
२६ ऑक्टोबर : भारत विरुद्ध बांगलादेश – बेंगळुरू
उपांत्य व अंतिम सामने
-
२९ ऑक्टोबर : उपांत्य सामना १ – गुवाहाटी/कोलंबो
-
३० ऑक्टोबर : उपांत्य सामना २ – बेंगळुरू
-
२ नोव्हेंबर : अंतिम सामना – कोलंबो/बेंगळुरू
यंदाचा महिला वर्ल्ड कप घरच्या मैदानाचा फायदा घेणाऱ्या भारतीय संघासाठी मोठी संधी आहे. चाहत्यांसाठी हा महिना क्रिकेटच्या उत्सवाप्रमाणे रंगणार आहे.
———————————————————————————————-