कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला होता. याला पाठबळ देण्यासाठी व या प्रकरणाची सखोल चोकशी व्हावी इंडिया आघाडीच्या वतीने आज दिल्लीत निवडणूक आयोगावर मोर्चा निघाला होता. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवला. खासदार राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केले आहे. मोर्चामध्ये तीनशे खासदार सहभागी झाले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने आंदोलकांच्या नेत्यांना दुपारी दोन वाजता चर्चेसाठी बोलावले आहे.
इंडिया आघाडीचा पूर्वनियोजित आज सकाळी मोर्चा निघाला होता. मात्र संसदेबाहेर काही अंतरावरच इंडिया आघाडीचा मोर्चा अडवण्यात आला आहे. या मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी सर्वांना अडवलं असून त्यानंतर खासदरांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे.
इंडिया आघाडीने संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत आंदोलनाचा प्रयत्न केला, परंतु दिल्ली पोलिसांनी ट्रान्सपोर्ट भवनाजवळ बॅरिकेड लावून मोर्चा रोखण्याचा निर्णय घेतला, त्याच पोलिसांनी राहुल गांधी यांना अटक करण्यात आले.
दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकण्यासाठी इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरुवात केली. मोर्चात तीनशे खासदार सहभागी झाले. राहुल गांधी, प्रियांका गांधींसह शरद पवार आणि संजय राऊत या मोर्चात सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. लोकसभा, राज्यसभेच कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित केले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचा मोठा गदारोळ.
पोलिसांनी हा मोर्चा रोख्ल्यानंतर निवडणूक आयोगाने अन्य विरोधी नेत्यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले. विशेषतः, काँग्रेस नेते जयराम रमेश आणि इतर सुमारे ३० विरोधी पक्ष नेत्यांना आज दुपारी १.३० वाजता चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
—————————————————————————————————-