कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान ‘ ७ लोक कल्याण मार्ग ’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधन साजरा केला. या वेळी ब्रह्माकुमारी दीदींनी पंतप्रधानांना राखी बांधली, तर शाळेच्या गणवेशातील लहान मुलींनीही त्यांना राखी बांधून फोटो काढले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही महिलांनी व लहान मुलींनी राखी बांधून सणाचा आनंद लुटला.
देशभरात भाई-बहिणींच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा झाला. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र या सणाचा आनंद, जल्लोष आणि भावनांचा सोहळा पाहायला मिळाला.महाराष्ट्रातही रक्षाबंधनाचा उत्साह शिगेला पोहोचला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दरवर्षीप्रमाणे त्यांच्या मोठ्या बहिणी जयवंती देशपांडे आणि नयन शहा यांच्या पत्नी हेतल नयन शहा यांनी औक्षण करून राखी बांधली. उद्धव ठाकरे यांना सुषमा अंधारे यांनी राखी बांधत भावबंधाचा धागा अधिक घट्ट केला.







