कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
इंडिया आघाडीने सोमवारी ११ ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर मतदान चोरीचा आरोप केला होता. या मतचोरीच्या आरोपानंतर वातावरण चांगलच तापलं असून घोटाळ्याविरुद्ध संसद आणि बाहेरही लढा उभारण्याचा निर्णय सर्वच विरोधी पक्षांनी घेतला आहे.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतदानात गोंधळ घातल्याचा गंभीर आरोप दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची दिल्लीत झालेली बैठक आणि राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र चर्चा यानंतर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ११ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीतर्फे निवडणूक आयोगविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली.
निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मतं चोरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वीच केला होता. पत्रकार परिषद घेत त्यांनी मोठा बॉम्ब टाकला असून हा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. गेल्या आठवड्यात इंडिया आघाडीचीही बैठक दिल्लीत पार पडली. राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र बैठक होऊन ही चर्चा झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाविरोधातील लढा तीव्र करण्याच निर्णय घेण्यात आला असून अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे सोमवार, ११ ऑगस्ट रोजी इंडिया आघआडीतर्फे निवडणूक आयोगविरोधात मोर्चा काढत एल्गार पुकारण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधताना या विषायवर पष्टीकरण दिले. उद्धव ठाकरे व राहुल गांधींच्या बैठकीत नेमकं काय घडलं, काय ठरलं, हेही राउत यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय या दोन्ही नेत्यांच्या भेटीत ठरल्याचं राऊत म्हणाले.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळे बाहेर काढण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदूतील जी चीप आहे, ती डिस्टर्ब झाली आहे. आमची डोक्यातील चीप बरोबर आहे. ११ तारखेला निवडणूक आयोगवर सर्वपक्षीयं मोर्चा काढण्याचं नक्की झालं आहे. आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होतील. सगळ्याच पक्षांचे खासदार, प्रमुख पदाधिकारी हे त्या मोर्चामध्ये सहभागी होतील हे ठरलं आहे, असं राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्लीत मुक्कामाला होते. त्यांना राहुल गांधींनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. राहुल गांधींनी निवासस्थानी, स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातील स्पेशल प्रेझेंटेशन दाखवलं. उद्धव ते नीट पाहिलं, समजून घेतलं. त्यानंतर भोजन व नंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मोजक्या लोकांची एक बैठक झाली. त्यावेळेस राहुल गांधी, खर्गे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, इतर प्रमुख नेते उपस्थित होते. त्या बैठकीत राजकारणाची पुढील रूपरेषा ठरली, अनेक विषयांवर चर्चा झाली, असं राऊत म्हणाले.
——————————————————————————————————-






