पन्हाळा : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जनावर खरेदी करण्याचा आणि विक्री करण्याचा व्यवसाय काही जनावराचे व्यापारी करत आहेत. परंतु त्यांना काही संघटना गायींच संरक्षण करण्यासाठी म्हणून अडवून मारहाण करततात. हा प्रकार शासनाने थांबवावा आणि रीतसर जनावरांचा व्यवसाय करणाऱ्या जनावरांच्या व्यापाऱ्याना अभय द्यावं, असं निवेदन कोडोली इथल्या जनावर व्यापारी संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर विनय कोरे यांना देण्यात आलं.
निवेदनात म्हंटले आहे, सध्या देशभरामध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार गोवंशाची हत्या करून त्यांच्या मांसाची खरेदी विक्री करता येत नाही. नेमका हा मुद्दा उपस्थित करून जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची वाहने अडवून त्यांच्या वाहनांची तपासणी करणाऱ्या काही संघटना आहेत. या वाहनातून गाई म्हैशी यांची वाहतूक होत असते. या संघटनांपैकी काही लोक या जनावरांच्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत असतात. वेळप्रसंगी वाहनचालकाला तसेच व्यापाऱ्याला मारहाण देखील करत असतात. त्यामुळे जनावरांचे व्यापार करणारे व्यापारी सध्या भयभीत असून ते हा व्यवसाय करायचा की नाही अशा मनस्थितीमध्ये आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी हातकलंगले तालुक्यातील वडगाव इथल्या जनावरांच्या बाजारामध्ये या व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवला होता. जनावराच्या व्यापाऱ्यांनी जर हा व्यवसाय बंद केला तर त्याचा तोटा शेतकरी वर्गाला देखील सहन करावा लागणार असं देखील काही शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. एकूणच हा व्यापार करत असताना अनेक नियम आहेत. एका वाहनांमध्ये किती जनावर भरायची, कोणती जनावर भरायची, त्यांची वाहतूक कशी करायची याबाबत काही नियम अटी आहेत, असं असताना देखील काही सामाजिक संघटना या व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा आणि रितसर नियमाप्रमाणे जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना शासनाने अभय द्यावं.
जनावरांच्या गाड्या अडवणाऱ्या संघटना वेळप्रसंगी या व्यापाऱ्यांच्याकडून पैशाची मागणी करतात आणि खंडणी देखील वसूल करतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई देखील होणे गरजेचे आहे असेही या संघटनेचे म्हणणं आहे.



