कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अजितदादा नेमकं कसं बोलतील याचा अंदाज येत नाही. ते सहजपणे वावरतात. जनतेत मिसळून जातात. रुबाब दाखवत नाहीत. ते स्पष्ट बोलतात. प्रसंगनुरूप बोलतात. त्यात परिस्थितीचे भान असते. त्यांच्या बोल्ण्यात विनोद असतो. बोलता बोलता ते सहजपणे कुणाचा तरी चिमटा काढलेला असतो. नुकतच ते एका हॉटेलच्या उद्घाटनाला गेले होते. हॉटेल मालक अजितदादांना म्हणाले दादा नाष्टा करुन जा. त्यावर अजितदादा म्हणाले, आज खरंच वेळ नाही. पुढच्या वेळी आलो की नक्की जेवण करेन. तेव्हा मात्र माझं बिल घेऊ नका. पुढे अजितदादा म्हणाले, पण हा चेष्टेचा भाग झाला. मी स्पष्ट सांगतो. राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. हॉटेलमध्ये कोणी ही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज भल्या सकाळी चाकण दौऱ्यावर होते. सकाळच्या सुमारास तेथे इतकी वाहतुकीची गर्दी पाहून अजितदादा अवाक झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. नाशिक-पुणे आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील ठिकठिकाणच्या चौकात वाहतूक कोंडी नेहमीची असते. याचं चौकातून चाकण कर्मचाऱ्यांना औद्द्योगिक वसाहतीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या औद्द्योगिक वसाहतीमध्ये लहान-मोठ्या जवळपास १७०० ते १८०० कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये जवळपास चार लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनाची नियमित वर्दळ असते. इतका हा रस्ता कायम रश असतो. कायम रस्ता फुल असतो यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न नित्याचाच असतो. आज प्रत्यक्ष अजीतदादांना सकाळी सकाळी याचा प्रत्यय आला. म्हणून अजितदादांनी या रस्त्यांची पाहणी केली.
वाहतूक कोंडीबद्दल अजितदादांनी पोलीसांना खडसावले
अजितदादांनी तत्काळ पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंशी बोलले, मी सकाळी ६ वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की मागे गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक हावरमध्ये काय अवस्था होत असेल. अजितदादा या रस्त्याची पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पोलिसांनी वाहनं थांबविली. यामुळेही वाहतुकीची कोंडी होऊ लागली. लागलीच अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे?, सगळी वाहतूक सुरु करा, असे म्हणून अजित पवार यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुक कोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.