कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण“ या महत्त्वाकांक्षी योजनेचा १२ वा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जुलै २०२४ पासून सुरु झालेल्या या योजनेमुळे लाखो महिलांना दरमहा आर्थिक सन्मान निधी मिळत आहे. या योजनेचा लाभ महिलांना होत आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली की, “जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.” त्यामुळे लाभार्थी महिलांना लवकरच त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.
ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये सन्मान निधी दिला जातो.
योजनेला १२ महिने पूर्ण
जुलै २०२४ पासून सुरु झालेल्या या योजनेला आता बारा महिने पूर्ण झाले आहेत. या दरम्यान, राज्यातील कोट्यवधी महिलांना नियमितपणे आर्थिक मदत मिळाल्यामुळे घरखर्च, शिक्षण, आणि लघुउद्योगांसाठी मोठा आधार मिळाल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य सरकार (मुख्यमंत्री कार्यालय) यांच्याद्वारे मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेला आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या उपक्रमाचा उद्देश असा – मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व महिला सक्षमीकरण करणे.