‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ योजनेच्या ६ व्या हप्त्याचे वितरण सुरु झाले असून थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होत आहेत. असंख्य शेतकऱ्यांनी पैसे जमा झालेचे त्यांना मोबाईल वर संदेश आल्यावर याबाबत समाधान व्यक्त केले आहे. . २४ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ रोजी जमा झाला होता. तेव्हापासून दोन्ही योजना संलग्न असल्याने शेतकरी वर्ग ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी च्या प्रतीक्षेत होता. उशीर होत असल्याबद्धल अनेक जणांनी नापसंती व्यक्त केली होती. निदान ३१ मार्च ला तरी सदर योजनेतील हप्ता जमा होईल अशी अपेक्षा होती.परंतु त्यानंतर दोनच दिवसात पैसे जमा झाले. एकूण २१७० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.
शेतक-यांनी त्यांच्या खात्यावर निधी कशा तर्हेने जमा झाला आहे हे पाहण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ‘स्टेटस्’ तपासणे आवश्यक आहे. https://nsmny.mahait.org ही अधिकृत वेबसाईट आहे . त्यावर आपला नोंदणी क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक टाकावा. आलेला ओटीपी भरून ‘गेट डाटा’ वर क्लीक करावे त्त्या नंतर आपल्या नाव व पत्यासाहित जमा झालेली रक्कम, मिळालेले हप्ते यांची माहिती मिळेल. हप्ते नियमित मिळाले नसल्यास त्याची कारणेही पहावयास मिळतील.
चालू हप्ता हा ६ वा हप्ता असून त्याची रक्कम रु. २०००/- आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेत नोंदणी कृत लाभार्थी हेच ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ चे लाभार्थी आहेत. आधार कार्ड हाच यात मुळ बेस आहे. आपले बँक खाते आधार कार्ड शी संलग्न असणे आवश्यक आहे. यातील अर्ज काही तृटी मुळे नाकारला गेला असल्यास PM-KISAN पोर्टल वरिल शेतकऱ्याच्या ‘स्वयं -नोंदणीचे अद्ययावतीकरण’ या विंडो द्वारे अर्ज संपादित करून पुन्हा ‘सबमिट ‘ करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीच्या हेतूने सरकारने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना राबवली होती. त्यात राज्य शासनाच्या अनुदानात वाढ करून २०२३-२४ वर्षा पासून नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना राज्यात आणली आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत प्रती वर्ष प्रती शेतकरी रु. ६ हजार लाभ दिला जातो त्यामध्ये महाराष्ट राज्य शासन आणखी ६ हजार रुपयांची भर घालून रु १२ हजार रु लाभ देत आहे.