एचएसआरपी नंबरप्लेटसाठी शेवटची मुदत

राज्य परिवहन विभागाचे आवाहन

0
89
Google search engine

कोल्हापूर: प्रसारमाध्यम न्यूज

राज्य परिवहन विभागाने वाहनधारकांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) लावण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट निश्चित केली आहे. सध्या या मुदतीस फक्त १० दिवस उरले असून, विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. या नियमाचं पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच, नियम झुगारून देणाऱ्यांकडून दंडही आकारला जाईल.

राज्यात एकूण २.१ कोटी वाहनं असून, आतापर्यंत फक्त २३ लाख वाहनांनाच नव्या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या आहेत.  १ एप्रिल २०१९ पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसवणं बंधनकारक आहे. यामध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, व्यावसायिक, खासगी सर्व वाहनांचा समावेश आहे. २०१९ नंतरच्या वाहनांना आधीच या प्लेट्स लावण्यात आल्या असल्याने त्यांना याची गरज नाही. हा नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांना एक हजार ते दहा हजार रुपये पर्यंत दंड आहे. याआधी मार्च २०२५, एप्रिल २०२५ आणि जून २०२५ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

कशी करायची एचएसआरपीसाठी नोंदणी 

  • वाहनाच्या रजिस्ट्रेशननुसार, योग्य आरटीओ कोड निवडावा.
  • वाहनाची सूचित केलेली माहिती भरा जसे कि, नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक
  • नजिकच्या फिटमेंट सेंटरवर तारीख आणि वेळ निवडावी.
  • जी तारीख दिली जाईल त्या तारखेला फिटमेंट सेंटवर आपलं वाहन घेऊन जावावे.
  • – एचएसआरपीसाठी : www.transport.maharashtra.gov.in येथे किवा www.bookmyhsrp.com येथे ऑनलाईन अर्ज करावा.

ज्या वाहनधारकांनी वाहनावर अद्याप एचएसआरपी बसवलेली नसेल, तर ती लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावरून किंवा अधिकृत विक्रेत्यांमार्फत बसवावी. ही प्लेट केवळ कायदेशीरदृष्ट्या आवश्यक नाही, तर वाहन चोरी टाळण्यासाठी आणि ट्रॅकिंगसाठी उपयुक्त आहे. असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केली आहे. 

————————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here