व्हॉट्सअपचा नवा नाईट मोड कॅमेरा

कमी प्रकाशात फोटोसाठी क्रांतिकारी फिचर !

0
94
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

कमी प्रकाशात फोटो काढताना जर तुमचा अनुभव फारसा समाधानकारक नसेल, तर आता काळजी करू नका ! व्हॉट्सअप आपल्या युजर्ससाठी कॅमेऱ्यात एक नवीन “नाईट मोड” नावाचं महत्त्वाचं फिचर घेऊन आलं आहे, ज्यामुळे आता अंधुक प्रकाशातही स्पष्ट, ब्राइट आणि नॉईज-फ्री फोटो घेणं शक्य होणार आहे.

नाईट मोड : काय आहे याचे फायदे ?
या नव्या नाईट मोड फिचरचा युजर्सना अनेक थेट फायदे मिळणार आहेत
  • एक्सपोझर ऑटोमॅटिक अ‍ॅडजस्ट होईल, त्यामुळे फोटो अधिक ब्राइट आणि संतुलित दिसेल
  • नॉईज कमी केलं जाईल, जेणेकरून ग्रेन्स कमी वाटतील
  • शॅडो आणि डार्क एरियात अधिक डिटेल्स दिसतील, त्यामुळे फोटो जास्त स्पष्ट
  • एक्सटर्नल फ्लॅश वा लाईटची गरज नाही. मोबाईलच्या कॅमेऱ्यातूनच दर्जेदार फोटो
  • लक्षात ठेवा : हा मोड युजरने स्वतः ऑन केल्यावरच कार्यान्वित होतो, त्यामुळे वापर करताना चंद्रासारखा आयकॉन सक्रिय करावा लागेल
व्हॉट्सअपने आणलेले इतर कॅमेरा अपडेट्स
नाईट मोड व्यतिरिक्त व्हॉट्सअपने अलीकडेच आपला इनबिल्ट कॅमेरा अधिक स्मार्ट बनवण्यासाठी अनेक फिचर आणले आहेत
  • नवे फिल्टर्स : फोटो वा व्हिडीओ क्लिक करण्यापूर्वी रिअल-टाईम इफेक्ट्स लावण्याची सुविधा
    ( पूर्वी हे फक्त व्हिडीओ कॉलमध्येच उपलब्ध होतं )
  • यामुळे फोटो अधिक कलरफुल, क्रिएटीव आणि इन्स्टाग्राम स्टाईलमध्ये येतील
प्रोफाईल फोटो अपडेट : थेट Instagram वा Facebook वरून
WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअप लवकरच एक नवीन फिचर आणत आहे ज्याद्वारे युजर्स थेट Instagram किंवा Facebook वरून आपला प्रोफाईल फोटो इम्पोर्ट करू शकतील.
सध्या उपलब्ध पर्याय :
  • कॅमेरा
  • गॅलरी
  • अवतार
  • एआय जनरेटेड इमेज
नव्या अपडेटनंतर – Instagram व Facebook चे पर्यायही त्यात जोडले जातील, ज्यामुळे तुमचं डिजिटल ओळख अधिक सहज आणि जोडलेली होणार आहे.
बीटा युजर्ससाठी उपलब्ध सर्वांपर्यंत लवकरच!
सध्या नाईट मोड फिचर Android व्हर्जन 2.25.22.2 बीटा युजर्ससाठी चाचणी टप्प्यात आहे. सर्व युजर्ससाठी हे अपडेट लवकरच रोलआउट होण्याची शक्यता आहे.

———————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here