जोतिबा डोंगर : प्रतिनिधी
श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा येत्या बुधवारी ३० जुलै रोजी होत असून या यात्रेसाठी महाराष्ट्र,कर्नाटक आणि इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक डोंगरावर दाखल होतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा रात्रभर असते. यात्रा अवघ्या दोन दिवसांवर आली असून जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणारी कामे अंतिम टप्प्यात आली असून यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आल आहे.
महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या आणि अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा मंदिरातील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा येत्या संपन्न होत आहे, अंदाजे तीन ते चार लाख भाविक डोंगरावर येतील यां दृष्ठिकोनातून नियोजन सुरु आहे, जोतिबा मंदिर आणि परिसरातील जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणारी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे ज्योतिबा मंदिरातील सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
गुलाल-खोबरे नारळ, मिठाई आणि इतर साहित्य डोंगरावरील दुकानदार दुकानात भरत आहेत, सध्या पावसाळ्याचे दिवस असून येणाऱ्या भाविकांना योग्यरीत्या दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांगेच्या वरती पत्र्याचा मंडप घालण्यात आला आहे. मंदिरात पाय घसरू नये म्हणून मॅट टाकण्यात आले आहेत, डोंगरावर येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी, रस्ताच्या बाजूचे कठडे, बाजू पट्ट्या, दिशादर्शक फलक, स्वच्छता, अतिक्रमण काढणे यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहे.
ही यात्रा रात्रीची असल्याने दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्ग सुरक्षा, पार्कींग सुविधा, सीसीटीव्ही, लाईट, पाणी आदी विषयावर प्रामुख्याने तयारी सुरू आहे. यात्रेच्या तयारीची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यात्रा अवघ्या दोन दिवसांवर आली असून जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणारी कामे अंतिम टप्प्यात आली आहे.
डोंगरावर येणाऱ्या भाविकांनी ही यात्रा प्लास्टिक मुक्त करून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ग्रामसेवक विठ्ठल बोगम यांनी केले आहे.
———————————————————————————————-




