७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

‘शामची आई’ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा सन्मान !

0
87
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

सर्वात मानाचा आणि प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यंदा राष्ट्रीय पुरस्कारांचे ७१ वे वर्ष होते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

या वर्षीचा सोहळा विशेष ठरला तो दोन अभिनेत्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी आणि गुणी अभिनेता विक्रांत मेसीला ‘१२थ फेल’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. राणी मुखर्जी हिला ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला.

प्रमुख विजेत्यांची यादी : चित्रपट श्रेणीतील पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – शामची आई
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – कथल
  • सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पार्किंग
  • सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – भागावंत केसरी
  • सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट – डीप फ्रीजर
  • सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – वश
  • सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट – गॉडडे गॉडडे चा
  • सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा चित्रपट – नाळ २
  • सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट – हनुमान
  • सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री – गॉड, वल्चर अँड ह्युमन
  • सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक चित्रपट – टाइमलेस तमिळनाडू
व्यक्तिगत कामगिरीसाठी पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान (जवान), विक्रांत मेसी (१२थ फेल)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राणी मुखर्जी
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी, जानकी बोडीवाला
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार (मराठी) – कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकले, भार्गव
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक – आशीष भेंडे (आत्मपॅम्फलेट)
  • सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी – वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल)
  • सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन – अॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) – शिल्पा राव
मागील वर्षाची झलक
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनेता ऋषभ शेट्टीला ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटासाठी गौरवण्यात आलं होतं. तर नित्या मेनन (‘थिरुचित्रंबलम’) आणि मानसी परेख (‘कच्छ एक्सप्रेस’) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून मिळाला होता.
या पुरस्कार सोहळ्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रामाणिक, सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि कलात्मक कामगिरीला न्याय दिला आहे. नव्या दमाचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांना मिळालेला सन्मान ही संपूर्ण इंडस्ट्रीसाठी प्रेरणा ठरणारी बाब ठरली आहे.
————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here