कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे भुदरगड तालुक्यातील ९, गगनबावडा ४६, करवीर ५, पन्हाळा ३४ राधानगरी ३० व शाहूवाडी तालुक्यातील १५ अशा एकूण १३९ शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा स्तरावरुन वारंवार आढावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे.
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बंद असलेल्या शाळांची माहिती :
भुदरगड- एकूण शाळा- २३३, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- ९, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- ९
गगनबावडा – एकूण शाळा- २३७, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- ४४, माध्यमिक २, एकूण बंद असलेल्या
करवीर- एकूण शाळा- ३५५, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- ५, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- ५
पन्हाळा- एकूण शाळा- ३२०, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- ३४, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- ३४
राधानगरी – एकूण शाळा- २८०, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- ३०, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- ३०
शाहुवाडी- एकूण शाळा- ३२२, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- १५, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- १५
अशा एकूण एकूण शाळा- ३६८४, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- १३७, माध्यमिक २, एकूण बंद असलेल्या शाळा- १३९ शाळा बंद असल्याची माहिती डॉ. शेंडकर यांनी दिली आहे.