कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४.१८ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. तसेत पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी १९.८ फुटांवर असून जिल्ह्यातील १३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
- पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
- कासारी नदीवरील- यवलूज
- भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे
- दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिध्दनेर्ली, बाचणी असे एकूण १३ बंधारे पाण्याखाली आहे.
- आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.
- राधानगरी – ४.१८ टीएमसी,
- तुळशी – १.८६ टीएमसी,
- वारणा – १३.७५ टीएमसी,
- दूधगंगा – ५.०० टीएमसी,
- कासारी – ०.८२ टीएमसी,
- कडवी – १.०६ टीएमसी,
- कुंभी – १.२७ टीएमसी,
- पाटगाव – १.५३ टीएमसी,
- चिकोत्रा – ०.७५ टीएमसी,
- चित्री – ०.६० टीएमसी,
- जंगमहट्टी – ०.४४ टीएमसी,
- घटप्रभा – ०.८१ टीएमसी,
- जांबरे – ०.३२ टीएमसी
- आंबेआहोळ – ०.८५ टीएमसी,
- सर्फनाला – ०.१८ टीएमसी
- धामणी – ०.११ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे – राजाराम २०.३ फूट, सुर्वे २० फूट, रुई ४६.४ फूट, इचलकरंजी ४१ फूट, तेरवाड ३९.२ फूट, शिरोळ ३४.६ फूट, नृसिंहवाडी ३२.१० फूट, राजापूर २३ फूट तर नजीकच्या सांगली १५.६ फूट व अंकली १५.६ फूट अशी आहे.
————————————————————————————