कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
११०७ उर्दु माध्यमाच्या विद्यार्थी / उमेदवारांची डी.एल.एड परीक्षा व TAIT 2025 परीक्षा एकाच दिवशी येत आहे. तेव्हा डी.एल.एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेस प्रविष्ठ होणारे जे विद्यार्थी / उमेदवारांची TAIT-२०२५ परीक्षेसाठी सुध्दा प्रविष्ट झाले असतील अशा विद्यार्थी / उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ३ जून २०२५ ऐवजी उद्या ३० मे २०२५ रोजी नियोजित केले असल्याची माहिती आयुक्त पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थानाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने नियोजन दिनांक २७ ते ३० मे २०२५ व दिनांक २ ते ५ जून २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे.
११०७ उर्दु माध्यमाच्या प्रविष्ठ विद्यार्थी / उमेदवारांनी उपरोक्त बदलाची नोंद घ्यावी. परीक्षेस दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे. त्या नुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वत:ची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेऊन परीक्षस उपस्थित रहावे. याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावर राहील याची नोंद घ्यावी.
———————————————————————————–



