कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार ता. १३ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करणार आहे. यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
दहावीचा निकाल कधी लागणार, याबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात प्रश्न होते. बोर्डाने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल १५ मे च्या आत लागणार आहे असे जाहीर केले होते. निकाल उद्या मंगळवारी (ता.१३) रोजी विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून त्यांचे गुण ऑनलाइन पाहता येतील.
– mahahsscboard.in
-mahresult.nic.in
– msbshse.co.in
– mh-ssc.ac.in
– sscboardpune.in
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “यंदा १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत विद्यार्थिसंख्या दोन हजारांनी वाढली होती.” याचा अर्थ, यावर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी एकूण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली आणि १९ तृतीयपंथी विद्यार्थी होते. राज्यभरात ५ हजार १३० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.



