कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यंदा शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षाही लवकर घेण्यात आल्या होत्या. यंदा बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला घेण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले.
२०२५ साली परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागेल असे, शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपत आले असून, निकालाचे काम लवकर सुरू करण्यात येईल अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. जून महिन्यात पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने यंदा मे महिन्यातच निकाल लावणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले. छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जिल्ह्यात बारावीची ४६० केंद्रांवर परीक्षा पार पडली. या पाच जिल्ह्यात एकूण १ लाख ८५ हजार ३३० विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. तर लातूर विभागातील तीन जिल्ह्यात ९५ हजार ६९७विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २४९ परीक्षा केंद्रावरुन बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यानंतर लगेचच उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पाठविण्यात आल्या. उत्तरपत्रिकांची वेळेत तपासणी व्हावी यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यासाठी ८ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ८ एप्रिलपर्यंत जवळपास पूर्ण उत्तरपत्रिका तपासून जमा झाल्याची अधिकाऱ्यांनी दिली.






