अमेरिकेने मदत थांबवल्यावर यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेनस्की दबावाखाली आले होते. युक्रेनच्या खनिज संपत्तीचे अधिकार व इतर बाबतीतील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेनस्की यांच्यातील चर्चा फिसकटल्याचे चित्र ‘लाईव्ह ‘सा-या जगाने पाहिले. आठवड्या पूर्वी अमेरिकेने युक्रेनल देत असलेली लष्करी मदत व युद्धाबाबत ची गोपनीय माहिती शेयर करणे थांबवले.
परंतु सर्व संपले असे वाटत असताना डोनाल्ड ट्रम्प मात्र अविचल होते. त्यांचे दबावतंत्र एक बाजूने काम करत असताना दोन्ही देशातील ‘संवाद ‘ थांबू नये याची पूर्ण दक्षता ट्रम्प यांनी घेतली होती. अमेरिकेस नेमके काय पाहिजे याची माहिती त्यांनी स्पष्टपणे दिली व संपूर्ण युद्धाचे दोषारोपण जणू त्यांनी झेलेनसकी वर टाकले होते. परंतु ‘ व्यापारी डील’ संपुष्टात आलेली नव्हती. आपण पुढील डील साठी तयारच आहोत असाच त्यांचा पवित्रा होता.
सौदी अरेबियाच्या जेदाह मध्ये दोन्ही देशांचे अधिकारी २८ जानेवारीच्या त्या वादळी बैठकीनंतर भेटले. ८ तासांच्या चर्चेनंतर अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ म्हणाले की यू एस आता हा प्रस्ताव रशियाकडे पाठवेल. आता चेंडू रशियाच्या कोर्टात ! अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉलट्झ रशियनराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना भेटतील तसेच टृम्प यांचे विशेष अधिकारी स्टिव वीटकॉफ हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेटतील.
मंगळवारी दोन्ही देशनी मिळून प्रसिद्ध केलेल्या पत्रक प्रमाणे युक्रेन मधील खनिज संपत्ती बाबत दोन्ही देश संमत झाल्यानंतर सायंकाळी अमेरिकेने थांबलेली लष्करी मदत व गोपनीय माहिती शेयर करणे हे दोन्ही सुरू झाल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यानी जाहीर केले. त्यानंतर लगेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेनसकी यांनी अमेरिका सुचवत असलेला युद्धविरामाचा प्रस्ताव मान्य करत असल्याचे व आता रशियानेही हे मान्य केले पाहिजे असे सांगितले. त्यानंतर सर्व प्रक्रियेस गती आली. रशियाच्या परराष्ट्र खात्याने या बाबत अमेरिकन प्रतिनिधिशी बोलण होऊ शकते असे सूचक वक्तव्य केले आहे. ट्रम्प व पुतीन यांचे जवळचे संबंध हा यातील अजून एक सकारात्मक दुवा ठरू शकतो.

या आधी ही रशियन अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी शांती प्रस्तावबाबत रशियाचे हित संभळून चर्चा होऊ शकते असे संकेत दिले होते. सर्व काही सकारात्मक घडू लागले आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात रशिया अमेरिका यांच्यात नेमके काय ठरते यावर बरेच अवलंबून आहे.
ट्रम्प यांच्या ‘व्यापारी डील’ च्या कौशल्यास केजीबीच्या तालमीत तयार झालेले व ‘पोलादी थंडपणे डील’ करणारे पुतीन कसे प्रतिसाद देतात यावर टृम्प यांनी इथपर्यंत आणलेल्या या डील चे भवितव्य आहे.