शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने सोमवार दि.१७ मार्च, २०२५ रोजी तुकाराम बीजे निमित्त तुकोबांचे चौदा टाळकरी या विषयावर डॉ. श्रीरंग गायकवाड(कोल्हापूर) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के असणार आहेत. सदर व्याख्यान शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर येथे सायंकाळी ५.०० वा. होणार आहे. तरी व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मराठी विभागप्रमुख आणि संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रा. (डॉ.) नंदकुमार मोरे यांनी दिली.
१७ मार्च रोजी डॉ. श्रीरंग गायकवाड यांचे व्याख्यान
RELATED ARTICLES