सिंधुदुर्ग जवळील मालवण समुद्रात व पालघर जिल्ह्य़ातील डहाणू येथील समुद्रात 5388 व 13131 चौरस किमी येवढ्या प्रचंड क्षेत्रात खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. गेल्या 8 वर्षांपासूनच्या संशोधनाचे हे फलित असून लवकरच उत्खनन सुरू होईल.
तब्बल 18000 चौरस किमी येवढ्या मोठ्या प्रमाणात हे साठे असल्याने कोकणासाठी औद्योगिक प्रगती व रोजगाराच्या संधीच निर्माण होणार आहेत. 1974 च्या ‘ बाॅम्बेहाय’ या मुंबईच्या समुद्राच्या साठ्यानंतर 2017 मधेही तेल साठे आढळून आले होते. तेथील अमृत व मुंगा या तेल विहिरी द्वारे ते उत्पादीत केले जाते.
कोकणातील या नवीन साठ्यांच्या शोधामुळे महाराष्ट्रातील विकासासही चालना मिळेल. एकीकडे प्रगती व दुसरीकडे प्रदुषण यातील सुवर्णमध्य राखून कोकणच्या विकासाला यातून शाश्वत गती मिळावी.