spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

HomeUncategorizedशिवाजी विद्यापीठाचे सन २०२५-२६ चे वार्षिक अंदाजपत्रक दृष्टीक्षेपात…

शिवाजी विद्यापीठाचे सन २०२५-२६ चे वार्षिक अंदाजपत्रक दृष्टीक्षेपात…

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 व विद्यापीठ लेखा संहिता मधील तरतुदीनुसार विद्यापीठाच्या सन 2024-25 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2025-2026 चे “विद्यार्थी केंद्रित व संशोधनाला चालना देणारे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत” असे वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून सदर अंदाजपत्रकास वित्त व लेखा व समितीच्या दि. 31 जानेवारी, 2025 रोजीच्या बैठकीतील ठराव क्र. 2 अन्वये व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली. दिनांक 04 मार्च, 2025 रोजीच्या बैठकीमध्ये व्यवस्थापन परिषदेने अंदाजपत्रकाची अधिसभेच्या मान्यतेसाठी शिफारस केली आहे. त्यानुसार सदरचे अंदाजपत्रक अधिसभेच्या मंजुरीसाठी आता सादर करण्यात येत आहे.

सन 2024-25 चे सुधारित व सन 2025-2026 चे वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्याकरिता विद्यापीठाने विकसित केलेल्या वेबबेस अंदाजपत्रक प्रणालीमध्ये सर्व विभाग व अधिविभाग यांना स्वतंत्र Online Login (पेपरलेस कामकाज होण्याच्या दृष्टीने) उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मधील तरतुदीनुसार, विविध मंडळांनी सूचित केल्याप्रमाणे विद्यापीठातील सर्व विभाग व अधिविभाग यांनी सन 2024-25 च्या सुधारीत जमा व खर्चाची माहिती तसेच सन 2025-2026 च्या अपेक्षित आर्थिक तरतुदींची online पद्धतीने अंदाजपत्रक प्रणालीमध्ये नोंद केली आहे.

सन 2024-2025 चे सुधारीत अंदाजपत्रक व सन 2025-26 चे वार्षिक अंदाजपत्रक याचा मसुदा तयार करण्यासाठी 1) डॉ. एस.एस. महाजन, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 2) डॉ. एस.बी. महाडीक, अधिविभागप्रमुख, संख्याशास्त्र अधिविभाग 3) डॉ. एम.व्ही. वाळवेकर, प्राणिशास्त्र अधिविभाग 4) डॉ. प्रभंजन माने, अधिविभागप्रमुख, इंग्रजी अधिविभाग यांची समिती नियुक्त केली होती. या समितीच्या सहाय्याने विद्यापीठातील सर्व अधिविभाग प्रमुख व प्रशासकीय विभाग प्रमुख यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मधील तरतुदीनुसार, विविध मंडळांनी सूचित केल्याप्रमाणे वित्त व लेखा अधिकारी यांनी, सर्व विभाग / अधिविभागांनी केलेल्या आर्थिक तरतुदींची छाननी करून सन 2024-25 चे सुधारीत व सन 2025-26 च्या वार्षिक अंदाजपत्रकाचा मसुदा तयार केला आहे.

सन 2025-2026 ची एकूण अपेक्षित जमा रू. 600 कोटी 10 लाख असून अपेक्षित एकूण खर्च रू. 605 कोटी 71 लाख आहे व अंदाजपत्रकीय तूट रू. 5 कोटी 60 लाख इतकी आहे. सदरची तूट विद्यापीठ निधीतील शिल्लकेतून भरून काढण्यात येणार आहे.

सन 2025-2026 या वर्षात प्रशासकीय विभागांकडून रु. 46 कोटी 18 लाख, शास्त्र अधिविभागांकडून रु.5 कोटी 32 लाख, इतर अधिविभागांकडून रु.3 कोटी 42 लाख जमा होण्याची अपेक्षा असून इतर उपक्रमांमधून रु.35 कोटी 31 लाख असे एकूण रु.90 कोटी 23 लाख विद्यापीठाच्या स्वनिधीत जमा अपेक्षित आहे. वेतन अनुदानापोटी शासनाकडून रु.152 कोटी 50 लाख, तर वेगवेगळ्या संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी रु.25 कोटी 51 लाख जमा अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या संशोधन व विकास निधीतून रु.42 कोटी 23 लाख इतकी रक्कम व घसारा निधीच्या शिल्तक रक्कमेतून रु.16 कोटी 51 लाख इतकी रक्कम जमेकरिता प्रस्तावित केलेली आहे. निलंबन लेख्यांमधून रु. 273 कोटी 12 लाख असे एकूण रु. 600 कोटी 10 लाख जमा होणे अपेक्षित आहे.

तसेच खर्चाकरिता पूढीलप्रमाणे प्रस्तावित केले आहे –

प्रशासकीय विभाग – रु. 55 कोटी 72 लाख, शास्त्र अधिविभाग रु. 7 कोटी 44 लाख, इतर अधिविभाग – रु. 7 कोटी 17 लाख, विविध सेवा व इतर उपक्रम रु.52 कोटी 99 लाख असा विद्यापीठाच्या स्वनिधीमधील रु.123 कोटी 32 लाख खर्च अपेक्षित आहे. वेतन अनुदान खर्च रु.157 कोटी 48 लाख, तर विविध वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या निधीमधून खर्चासाठी रु.13 कोटी 15 लाख तसेच संशोधन व विकास निधी रु.42 कोटी 23 लाख व घसारा निधी रु.16 कोटी 51 लाख, निलंबन लेखे रु.253 कोटी 01 लाख अशी एकूण रु.605 कोटी 70 लाखाची खर्चासाठी तरतूद प्रस्तावित आहे.

  • विद्यापीठाचे अंदाजपत्रक एकूण 5 विभागात विभागले आहे. (A, B, C, D, E)

1) A – देखभाल अंदाजपत्रक (: Maintenance) – विद्यापीठाच्या स्वः निधीमधील जमा आणि खर्चाचा समावेश या भागामध्ये केला जातो. विद्यापीठ स्वः निधीतून मंजूर केलेल्या पदांसाठी वेतन, आवर्ती व अनावर्ती खर्चाची तरतूद समाविष्ट आहे. विभाग व अधिविभाग यांना आवश्यक असणारे फर्निचर, नवीन उपकरणे व संगणक खरेदीसाठी ची तरतूद संशोधन व विकास निधीमधून करण्यात आली आहे.

2) B विकास अंदाजपत्रक (Development) यामध्ये घसारा निधी आणि संशोधन आणि विकास निधीमधून तरतुदींचा समावेश होतो. घसारा निधीमधून जुन्या इमारतींच्या बांधकामाबरोबरच दुरूस्तीची तरतूद, AMC, जुनीयंत्रसामुग्री निर्लेखित करुन नव्याने खरेदी करण्यासाठीची तरतूद केली जाते.

संशोधन व विकास निधीतून नव्या बांधकामासाठी तरतुदी, फर्निचर व नवीन उपकरणे खरेदीसाठी तरतुदी केल्या जातात.

3) C वेतन अंदाजपत्रक (Salary) शासन मान्य पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यासाठी तरतुदी केल्या जातात.

4) D एजन्सी स्कीम (Agency) यामध्ये यूजीसी, डीएसटी, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांचेकडून मिळणा-या अनुदानाचा समावेश होतो.

5) E निलंबन लेखे (Debt Heads) यामध्ये अॅडव्हान्सेस, ठेवी, विविध विभागांचे निधी, विविध अध्यासने, एन्डोंमेंट अॅड डोनेशन फंड, प्रॉव्हिडंट फंड इत्यादींचा समावेश होतो.

  • शिवाजी विद्यापीठाच्या सन 2025-26 च्या अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत-

शिवाजी विद्यापीठाचे सन 2025-26 चे विद्यार्थी केंद्रित अंदाजपत्रक पूढीलप्रमाणे तरतूदी करण्यात आल्या आहेत.

शिवाजी विद्यापीठ मेरीट स्कॉलरशिप करीता रु.60 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

  • सध्या विद्यापीठात 60 परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या सोयी सुविधाकरिता रु.67 लाख 15 हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे.

विद्यार्थीनी वसतीगृहाकरिता एकूण रु.3 कोटी 8 लाख तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये वसतीगृह दूरूस्ती, मेसची दुरुस्ती व दैनंदिन खर्चाचा समावेश आहे.

विद्यार्थी वसतीगृहाकरिता एकूण रु.2 कोटी 1 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

कमवा व शिका मुलींचे वसतीगृह सोयी सुविधा व दैनंदिन खर्चाकरिता रु.17 लाख 97 हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे.

रिसर्च स्कॉलर होस्टेल करीता रु.20 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

  • Youth Hostel या नवीन इमारतीकरीता रु. 3 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या वतीने विविध स्पर्धा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारासाठी रु.2 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

  • विविध खेळाचे साहित्य खरेदी करणेकरीता रु.25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
  • विद्यापीठातील खेळाची मैदाने सुस्थितीत राहण्यासाठी घसारा निधीतून रु.37 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम रुपये 10 लाख इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
  • Research promotion scheme for PG student अंतर्गत रु. 10 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.
  • विद्यार्थी सुविधा केंद्राकरिता रुपये 2 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.
  • Education tours to industry साठी रुपये 17 लाख 36 हजार इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
  • Plagiarism करिता रुपये 18 लाख इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
  • Student facility अंतर्गत (Youth Festival, Youth Activities, Expenses for Avishkar Competition, Expenses for Indradhanushya preparation, Expenditure for Aavhan preparation, Youth Parlment, Beti Bachao Abhiyan, Organ Donation Awareness Programme, इ.) रुपये 1 कोटी 47 लाख इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
  • Shivaji University Diamond Jubilee Post Doctoral Fellowship अंतर्गत रुपये 40 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.
  • संशोधनाला चालना देणेसाठी खालीलप्रमाणे तरतुदी करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी books & journals खरेदी व online subscription साठी ग्रंथालय विभागास रु. 3 कोटी 2 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

संशोधनाला चालना देण्याकरिता Research Scheme करीता रु. 2 कोटी 25 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

  • संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी (Software & Hardware) रु. 2 कोटी 63 लाख तरतूद करण्यात आली आहे.

संशोधन कार्यास चालना देण्यासाठी सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्र ही नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. व PM USHA अंतर्गत 7 कोटी 47 लाख इतके अनुदान प्राप्त.

संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाकडून PM USHA अंतर्गत उपकरणे खरेदीसाठी रु. 5 कोटी 77 लाख इतके अनुदान मंजूर आहे.

Golden Jubilee Research Scholar for Uni. & College Research student & Jubilee Prog. for Uni. Depts & Colleges अंतर्गत रु.80 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

Laboratory Expenses अंतर्गत रु.99 लाख 62 हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे.

Research Grants to College Teachers अंतर्गत रु.25 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

Best Performing Department अंतर्गत रु.20 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

Intellectual Property Right Cell अंतर्गत रु.10 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

University Industry Interaction Cell For Kop, Sangli & Satara अंतर्गत रु.10 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

. Research Colloquium Activity अंतर्गत रु.5 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

Center for Skill and Entrepreneurship Development अंतर्गत रु.3 लाख 50 हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे.

Industry Interaction Cell अंतर्गत रु.25 हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे सन 2025-26 च्या अंदाजपत्रकामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास (NEP) अनुसरून पुढीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे.

  • दूरशिक्षण व ऑनलाइन केंद्रांतर्गत डिजिटल आणि ऑनलाइन शिक्षणाकरिता रु. 1 कोटी 4 लाख इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
  • Shivaji University Centre for Innovation and Incubation साठी रु. 28 लाख 2 हजार इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

दिव्यांगासाठी रु.2 कोटी 50 लाख इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबाजवणीच्या अनुषंगाने workshop, seminar, conference, training programme इत्यादी बाबत PM USHA अंतर्गत soft component करीता रु.2 कोटी 16 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.

  • अंदाजपत्रकातील इतर तरतूदी पुढीलप्रमाणे-

विविध उपकरणे खरेदीसाठी 5.41 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिसरातील रस्ते सुस्थितीत राहण्यासाठी घसारा निधीतून रु. 1.50 कोटी (B.1.P.8, 8.1), तसेच नवीन रस्ते तयार करण्यासाठी संशोधन व विकास निधीतून रु. 1.60 कोटी (B.2.P.44, B.2.P.114) इतकी तरतूद करण्यात आली आहे.

संख्याशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ हॉल पूर्णत्वास आले असून फर्निचर करीता रू. 50 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिसर सुरक्षिततेच्या दृष्टीने compound बांधण्यात येत असून यावर्षी रु. 50 लाख तरतूद करण्यात आली आहे. (B.2.P.54)

सन 2024-25 मध्ये 500 kw सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून दरमहा 5 लाखाची वीज बिलामध्ये बचत झालेली आहे. (Solar System) सन 2025-26 करीता रु. 1 कोटी इतकी आर्थिक तरतूद प्रस्तावीत करण्यात आलेली आहे.

Wind-mill करीता रू. 5 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

वाणिज्य व व्यवस्थापन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून एकूण प्रशासकीय मान्यता 6.39 कोटी इतकी होती. त्यापैकी सन 2024-25 मध्ये 4 कोटी इतका खर्च झालेला आहे. सन 2025-26 करीता रू. 3 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे Youth Hostel – पहिल्या टप्प्यात तळमजल्याचे बांधकाम प्रस्तावित असून सदर चे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रगतीपथावर आहे. सदर कामाकरिता एकूण रु.3 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

  • यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून रु.10 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठ निधीतून तळमजल्या करीता रु. 50 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा वसतिगृहाकरिता रू. 3 कोटी तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाजनिक बांधकाम विभागामार्फत काम प्रगतीपथावर आहे.

  • लोकस्मृती वसतीगृह या योजनेअंतर्गत आजअखेर रु.1 कोटी लाख 4 इतकी रक्कम देणगी स्वरुपात प्राप्त झाली आहे. बांधकामाकरीता प्रथम टप्प्यात रु.1 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
  • शिवाजी विद्यापीठ कुस्ती संकुल बांधकामाकरिता सन 2023-2024 व 2024-2025 मध्ये रु.1 कोटी 20 लाख इतकी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार काम पूर्ण झाले असून स्वच्छतागृहाकरिता रू. 25 लाख तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून 8 कोटी 48 लाख 81 हजार 945 रुपयांचा प्राप्त निधीमधून भुयारी मार्गासाठी प्राप्त झाला होता सदर भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे.

  • संख्याशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठाचा हॉल पूर्णत्वास आला असून फर्निचर करीता रू. 50 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

“विद्यार्थी केंद्रित व संशोधनाला चालना देणारे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत” असे विद्यापीठाचे सन 2025-2026 चे वार्षिक अंदाजपत्रक व सन 2024-2025 चे सुधारित अंदाजपत्रक मंजूर करण्यात यावे, अशी मी सभागृहास विनंती करीत आहे.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments