भारताचे केंद्र सरकार व राज्य शासन जनतेच्या विकासासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, आरोग्यमय जीवनासाठी, अपंग , आर्थिक व सामाजिक दृष्टया मागासल्या वर्गाच्या मदतीसाठी सतत सहाय्यकारी योजना जाहीर करत असतात. पुष्कळ वेळा योजना गरजू पर्यंत नीट पोहोचत नाहीत. अथवा योजना गरजू पर्यंत पोहचल्या तरी सहभागाचे नियम व्यवस्थित समजले नसल्यामुळे योजनेत सहभागी होता येत नाही. ‘ प्रसारमाध्यम ‘ अशा योजना तपशिलासह देत आहे. वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा व गरजू पर्यंत या योजना जरूर पोहोचवाव्यात.
लेक लाडकी योजना
पात्रता – 1.महाराष्ट्राचे रहीवासी
2.लाभार्थी कुटुम्बाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा पेक्षा जास्त नसावे
3.मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झाला पाहीजे. या तारखेस वा नंतर जन्माला येणार्या एक अथवा दोन मुलीना लागू राहील.
4.पहील्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुम्ब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील,
5.दुस-या प्रसूतीवेळी जुळी अपत्ये जन्मास आल्यास एक मुलगी कींवा दोन्ही मुलीना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर
6.कुटुम्ब नियोजन शस्त्रक्रीया करणे अनिवार्य राहील.
7.लाभार्थ्याकडे नारिंगी किंवा पिवळे रेशन कार्ड असावे.
8.लाभार्थ्याचे बॅक खाते महाराष्ट्रात असणे आवश्यक
कागदपत्रे –
1. माता-पित्याचे पासपोर्ट साइज फोटो
2. मोबाइल क्रमांक.
3.मातापित्यांचे मूळ निवासी प्रमाणपत्र
4. माता-पित्याचे जन्म दाखले
5. माता-पित्याचे आय ( उत्पन्न) प्रमाणपत्र – तहसीलदार / समकक्ष अधिकार्याने प्रमाणित केलेले
6. माता-पित्याचे आधार कार्ड
7. बॅक खात्याची माहिती व पासबूकच्या पहील्या पानाची छायांकीत प्रत
8. मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरीता 18 वर्षे पूर्ण झालेवर मुलीचे मतदारयादीत नाव असल्याचा दाखला
9. प्रत्येक लाभाच्या ट्प्यावर शिक्षण घेत असल्याचा संबधीत शाळेचा दाखला.
10. अंतिम लाभाकरीता मूलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयम घोषणापत्र
लाभ –
1.मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रू.,
2. इयत्ता 1लीत 6 हजार रू.
3.इयता 6वीत 8 हजार रू.
4. इयत्ता 11वीत 8 हजाररू.,
5. 18 वर्षे पूर्ण झालेनंतर 75000 रू या प्रमाणे एकूण 1,01,000/- येवढी रक्कम देणेत येइल.
मुदत – लाभार्थी मुलीचे 18 वर्षे वय पूर्ण होइपर्यंत
उद्दीष्ट –
1.मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवुन मुलींचा जन्मदर वाढविणे ,
2. मुलींच्या शिक्षणास चालना देणे,
3.मुलींचा म्रुत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे,
4.कुपोषण कमी करणे,
5.शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 शून्य करणेसाठी प्रोत्साहन देणे.
अर्ज कसा करावा व टप्पे – ग्रामीण भाग – अर्ज अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका
- अ)लाभार्थीचा अर्ज स्विकृत करणे, तपासणी करणे व पोर्टलवर अपलोड करणे – अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका यांची जबाबदारी
ब) अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकार्याकडे सादर करणे – सम्बधित बाल विकास अधिकारी (ग़्रामीण) यांची जबाबदारी
क) अंतिम मंजूरी – संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी. मुम्बई साठी ही जबाबदारी नोडल अधिकारी यांची
2. नागरी भाग –
अ)लाभार्थीचा अर्ज स्विकृत करणे, तपासणी करणे व पोर्टलवर अपलोड करणे – अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका यांची जबाबदारी
ब) अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकार्याकडे सादर करणे – सम्बधित बाल विकास अधिकारी (नागरी) यांची जबाबदारी
क) अंतिम मंजूरी – संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी. मुम्बई साठी नोडल अधिकारी यांची जबाबदारी