तुमची मालमत्ता कोठेही असु देत त्याची खरेदी- विक्री नोंदणीची सोय आता आपल्याला राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या नोंदणी कार्यालयातच 1 मे पासून करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिली.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले, यापूर्वी राज्यातील एके ठिकाणचा दस्त अन्य जिल्ह्यात नोंदविता येत नव्हता. एका जिल्हा संहनिबंधक कार्यालयाच्या अंतर्गत असलेली खरेदी-विक्रीच्या दस्ताची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयामध्ये केली जात आहे. यामुळे खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जात होता. म्हणूनच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग ‘एक राज्य एक नोंदणी’ ही सोय करत आहे.
17 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यात ही सोय केली होती. त्यानंतर 1 एप्रिलपासुन पुणे व ठाणे जिल्ह्यात ही सोय केली होती. पुणे शहर व जिल्ह्यातिल एकूण 48 दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहून ही सोय 1 मे पासून राज्यात सर्वत्र करण्यात येणार आहे.