कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
हौसेने सुरु केकेल्या व्यवसायात मेघना नंतर नंतर इतकी रमली की तिने सात वर्षात १ कोटी रुपयापर्यंत व्यवसाय नेला. या व्यवसायात कमाई चांगली होते हे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा तिने नोकरीच्या आलेल्या संधी नाकारून या व्यवसायात लक्ष केंद्रित केले. या व्यवसायासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रशिक्षणही घेतले. अनुभवही घेतला. यानंतर मेघनाने २०१८ मध्ये ‘ड्रीम ए डझन’ नावाचा स्टार्टअप सुरू केला. या व्यवसायात शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव याचा मेघनाने पुरेपूर वापर केला. यासाठी करावे लागेल तितके कष्ट मेघनाने केले. बंगळूरुच्या मेघना जैनने संधीचे सोन केले. आज तिची कंपनी यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.
शेजारच्या कांकीकडून कपकेक बनवायला शिकली
मेघना जैन बेंगळूरुमध्ये राहते. तिने २०१८ मध्ये ‘ड्रीम ए डझन’ची सुरुवात केली. सुरुवातीला ती उन्हाळ्यामध्ये बेकिंगचे क्लासेस घ्यायची. नंतर तिने दिवाळीमध्ये कंपन्यांसाठी गिफ्ट हॅम्पर बनवण्यास सुरुवात केली. हळूहळू तिने बेंगळूरुच्या बाजारपेठेत स्वतःची ओळख निर्माण केली. मेघना १८ वर्षांची असताना कॉलेजच्या कॅफेटेरियामध्ये तिने हौसेने कपकेक विकायला सुरुवात केली. हा त्यांचा छंद होता. तिचे कपकेक लवकरच खूप प्रसिद्ध झाले. २०११ मध्ये मेघना यांनी त्यांच्या शेजारच्या काकींकडून कपकेक बनवायला शिकले. त्यांच्या कुटुंबाने आणि मित्रमैत्रिणींनी तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे तिने दर रविवारी कपकेक बनवायला सुरुवात केली. मग ती सोमवारी कॉलेजच्या कॅफेटेरियामध्ये ते विकत असे.
एका बिझनेस प्लॅन स्पर्धेने मेघनाचे आयुष्य बदलून टाकले. एनआयटीमध्ये झालेल्या या स्पर्धेत त्यांना तिसरे स्थान मिळाले. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. त्यांना इंडियन एंजेल नेटवर्क्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. या यशानंतर मेघनासमोर एक कठीण निर्णय होता. तिने कॉलेजचे शिक्षण पूर्ण करावे की व्यवसाय करावा, हे तिला ठरवायचे होते. मेघना यांना फंडिंग आणि इक्विटीबद्दल जास्त माहिती नव्हती. त्यामुळे तिने आधी आपली डिग्री पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, “मी नंतर व्यवसायाबद्दल विचार करेन.” शिक्षणासोबतच त्या कपकेकही विकत राहिली. त्यातून त्यांना दर महिन्याला सुमारे ७-८ हजार रुपये मिळत होते.
नोकरी की व्यवसाय
डिग्री पूर्ण झाल्यावर मेघना यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिने ‘इनर शेफ’ नावाच्या एका फूड टेक कंपनीमध्ये १ वर्ष ३ महिने काम केले. त्यानंतर तिने डेझर्टवर काम करायला सुरुवात केली. आपले कौशल्य अधिक चांगले करण्यासाठी तिने ‘केकवाला’मध्ये ट्रेनिंगसुद्धा घेतले. मेघनाला मोठ्या फूड इंडस्ट्री कंपन्यांसोबत काम करायचे होते. त्यामुळे तिने स्टारबक्समध्ये नोकरीसाठी अर्ज केला. जेव्हा तिला काही उत्तर मिळाले नाही, तेव्हा तिने स्वतःचा केकचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, तिच्यासमोर आणखी एक कठीण प्रश्न उभा राहिला. जेव्हा मेघना स्वतःचे ब्रँड लाँच करणार होती, तेव्हा तिला स्टारबक्समधून नोकरीची ऑफर आली. तरीही, तिने स्टारबक्सची नोकरी सोडून स्वतःचा केकचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
मेघना जैन यांनी जानेवारी २०१८ मध्ये ‘ड्रीम ए डझन’ लॉन्च केले. ६ महिन्यांनंतर तिने केकचा व्यवसाय घराच्या किचनमधून दोन बेडरूमच्या घरात शिफ्ट केला. २०२० मध्ये तिने एक मोठी कमर्शियल जागा घेतली. मेघनाने तिचा व्यवसाय नवीन जागेवर शिफ्ट केला आणि लगेचच कोरोनाची महामारी आली. तिला तो व्यवसाय बंद करावा लागला. हा खूप कठीण काळ होता. तिने खूप मेहनत आणि वेळ दिला होता. पण, मेघनाने हार मानली नाही. तिने या संधीचा उपयोग त्यांच्या टीमचे कौशल्य सुधारण्यासाठी केला. तिने त्यांच्या टीमला केक बनवण्याची नवीन तंत्रे शिकवली.२०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये त्यांच्या व्यवसायात खूप वाढ झाली. महामारीच्या आधी मेघनाचा ब्रँड दर महिन्याला १-१.५ लाख रुपये कमवत होता. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये तिने ३० लाख रुपये कमावले. आता कंपनीचा टर्नओव्हर वाढून दरवर्षी १ कोटी रुपये झाला आहे.