केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज आसाम मधील नूतनीकरण झालेल्या देरगांव (जि -गोलघाट ) येथील लाचित बरफुकन पोलिस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले. त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की हितेश्वर सैकीया आसाम मध्ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्री (१९८३-८५ व १९९१-96) असताना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध आम्ही ‘आसाम की गालिया सुनी है, इंदिरा गांधी खूनी है ‘आशा घोषणा दिल्या. आम्हाला तुरुंगात टाकले. ७ दिवसांकरीता मी देखील आसाम मध्ये जेलचे अन्न खाल्ले आहे. त्यावेळी देशभरातले लोक आसाम ला वाचवणेसाठी आसाम मध्ये येत होते. आज आसाम विकास पथावर अग्रेसर आहे. आसाम सह काही शांतीचे करार झाले. १०००० रस्ता चुकलेली तरुण मुले पुन्हा मार्गाला लागली आहेत . एकेकाळी अशांत असलेले आसाम आता भारताच्या पहिल्या सेमी कंडक्टरच्या यूनिट साठी ओळखले जाते. लचित बरफूकन हे महान लढव्वये होते. त्यांनी मुघल सेनेचा पराभव केला व त्यांना दिल्लीस पिटाळून लावले. आज सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त पोलिस प्रशिक्षण केंद्र त्यांच्या नावे तयार झाले आहे. मी त्यांचे नाव सात वर्षाचा असताना शाळेत ऐकले होते परंतु नंतर पदवीधर होईपर्यन्त या महान सेनापतिबद्धल मला काही ही वाचावयास मिळाले नाही.त्यांचे नाव आसाम पूरतेच मर्यादित राहिले. आज २३ भाषा मध्ये त्यांचे चरित्र उपलब्ध आहे आणि देशभर शिक्षणात समाविष्ट केलेले आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमीत शाह आसाम व मिजोरम राज्यांच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी उद्घाटन केलेले लाचित बरफुकन पोलिस प्रशिक्षण केंद्र ३४० एकर वर पसरले असून त्याचे अद्ययावत केंद्रात रूपांतर करणेसाठी १२०४ कोटी एवढा खर्च आला आहे. या पाच मजली इमारतीत आधुनिक क्लासरूम्स असून त्यात अत्याधुनिक बंदूक सिम्यूलेटर (खऱ्या बंदुकीचे मॉडेल जे बुलेट्स ऐवजी लेसर किरण फायर करते पण जवळच्या अंतरासाठी चलवणाऱ्याला खऱ्या बंदुकीसारखा अनुभव देते. बंदूक प्रशिक्षणाकरीता व इनडोअर कमांडो प्रशिक्षणासाठी वापरतात), संशोधन प्रयोग शाळा, संग्रहालय, आधुनिक परेड साठी मैदान व प्रशासकीय कार्यालय आहे.
प्रशिक्षण केंद्राचे लचित बरफूकन हे नाव समर्पक असून लचित बरफूकन हे आसाम मधील अहोम राजवटीत सेनापति होते व त्यांनी १७व्या शतकात मध्ये विशाल मुघल सेनेचा आसाम मधील प्रवेश थोपवला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढील ५ वर्षात आसामचे हे लचित बरफूकन पोलिस प्रशिक्षण केंद्र देशातील आघाडीचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला.