कॅप्टन महेंद्रसिंह धोनी समोर चेन्नईला विजयी ट्रॅकवर आणण्याचं आव्हान

0
229
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

आयपीएलच्या १८ व्या मोसमात आतापर्यंत आश्वासक कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला गुरुवारी १० एप्रिलला मोठा झटका लागला. कर्णधार ऋतुराज गायकवाड याला कोपराला झालेल्या दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या चेन्नईचं टेन्शन आणखी वाढलं आहे. ऋतुराजच्या अनुपस्थितीत आता महेंद्रसिंह धोनी याच्या खांद्यावर उर्वरित हंगामासाठी चेन्नईची धुरा असणार आहे. धोनी विकेटकीपिंगसह कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे आता धोनीसमोर ऋतुराजच्या अनुपस्थिति चेन्नईला विजयी ट्रॅकवर आणण्याचं आव्हान असणार आहे.

चेन्नईचा या मोसमातील खेळलेल्या ५ पैकी ४ सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव करत या मोहिमेत विजयी सुरुवात केली. मात्र, त्यानंतर चेन्नई विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली. चेन्नईने सलग चार सामने गमावले. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि पंजाब किंग्सने पराभूत केलं. विशेष बाब म्हणजे चेन्नईचा या चारही सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना पराभव झालाय. याचाच अर्थ असा की चेन्नईचे फलंदाज कुठेतरी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे कर्णधार धोनीला फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तसेच स्पर्धेत आव्हान कायम राखायचं असेल तर इतरांनाही त्यांची भूमिका चोख बजावण्याशिवाय गत्यंतर नाही. अशात आता धोनीची सीएसके कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

धोनीची कर्णधार म्हणून कामगिरी

दरम्यान महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने २००८ ते २०२३ पर्यंत चेन्नई आणि रायजिंग पुणे सुपर जायंट्सचं नेतृत्व केलं आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. धोनीने आयपीएलमध्ये २२६ सामन्यामध्ये नेतृत्व केलं आहे. त्यापैकी १३३ सामन्यात धोनी कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. तर ९१ सामन्यात धोनीच्या संघाला पराभूत व्हावं लागलं आहे. धोनीची कर्णधार म्हणून विजयी आकेडवारी ही ५९ टक्के अशी आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here