बलुचिस्तान मधील क्वेट्टा ते खैबर पखतूनख्वा प्रांतातील पेशावर येथे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस रेल्वे वर हल्ला झाला असून आख्या रेल्वेचे अपहरण झाले आहे. यात ६ जण मारले गेले असून रेल्वे चालक गंभीररित्या जखमी झाला आहे . या रेल्वे मध्ये ४०० पेक्षा जास्त प्रवासी असून त्यात लष्करी अधिकारीही आहेत असे समजते. बलुच लिबेरेशन आर्मी या स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी असणाऱ्या बलुचिस्तान मधील दहशतवादी गटाने याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानचे दहशत विरोधी पथक दाखल झाले असून त्यांनी कारवाई सुरू केली आहे. रॉयटर वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार बलुचिस्तान लिबेरेशन आर्मीने याची जबाबदारी घेतली असून संपूर्ण रेल्वे आपल्या ताब्यात असल्याचे म्हणले आहे. सदर रेल्वे वर गोळीबार झाल्यानंतर रेल्वे रुळावरून घसरली व रेल्वेतील सर्व प्रवासी ओलिस बंदी ठेवले आहेत असे त्यांनी सांगितले आहे.
यामुळे बलुचिस्तानतील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. बलुचिस्तान पाकिस्तानातील प्रांत असून स्वायत्ततेची व स्वातंत्र्याची त्यांची जुनी मागणी आहे. पाकिस्तानातील हा सर्वात मोठा प्रांत आहे. भारत व पाकिस्तान स्वतंत्र होण्याआधी ब्रिटिश अधिपत्याखाली बलुचिस्तान संस्थान होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बलुचिस्तानचे विघटन होऊन काही भाग इराण मध्ये गेला. ब्रिटिश आधिपत्य संपल्यानंतर बलुचिस्तान स्वतंत्र राहायचे का, भारत अथवा पाकिस्तानात जायचे ही भूमिका स्पष्ट होण्याआधीच पाकिस्तानने सक्तीने बलुचिस्तानचा प्रांत बळकावला होता. बलुचिस्तानची भूमी खनीजसंपन्न असून खनिज वायुचे साठे सापडले आहे. पाकिस्तानने बलूच लोकाना कधीही स्वतंत्र नागरिकांचा दर्जा दिला नाही, दुय्यम दर्जाची वागणूक दिली व मानवी मूलभूत हक्कांची पायमल्ली केली. अनेक नागरिकांचे अपहरण केले गेले, बेकायदेशीरपणे अनेक नागरिकांच्या कोणत्याही चौकशीशिवाय पाकिस्तानी गुप्तहेर संघटनाकडून हत्या झाल्याचा आरोप अनेक बलुचिस्तानचे नागरिक करतात.पायाभूत , शिक्षण व आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे हा भाग विकसित न होता बलुचिस्तानची प्रगती खुंटली. बलुचिस्तान मधील मानवी हक्कांची पायमल्ली आम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या संस्थानी प्रकाशात आणल्यामुळे बलुचिस्तान मधील घटना आंतरराष्ट्रीय प्रकाशझोतात आल्या. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे बलूच समर्थक, दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान सरकार यातील बोलणी कधीही यशस्वी झाली नाहीत.
बलूचीस्तान लिबरेशन आर्मी
बलूचीस्तान लिबरेशन आर्मीचे ध्येय आहे बलूच लोकाना स्वातंत्र्य मिळवून देणे आणि स्वतंत्र बलुच राज्य स्थापन करणे. या संघटनेची स्थापना तशी अलिकडची म्हणजे २००० मधील. बीएलएने पाकिस्तानी अधिकारी, नागरिक आणि परदेशी नगरिकाना लक्ष्य करून बॉम्बस्फोट, हल्ला आणि अपहरण या सह विविध हिंसक कारवाया केल्या आहेत. पाकिस्तान , ब्रिटन व अमेरिका यांनी बीएलएला दहशतवादी संघटना मानले आहे. परंतु आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर बलुचिस्तान मधील संसाधनांचे विषम वितरण, वांशिक भेदभाव, राजकीय उपेक्षितता हीच खरी कारणे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अस्तित्वात येण्याची आहेत.
नवाब अकबर शाहबाज खान बुगटी ( जन्म १२ जुलै १९२६ – मृत्यू २६ ऑगस्ट २००६) यांना बलूचीस्तान लिबरेशन आर्मीचे प्रवर्तक मानले जाते. ते बलूच लोकातील बुगती जमातीचे प्रमुख होते. पाकिस्तान सरकार कडून बलूची लोकाना मिळत असलेल्या हीन वागणुकीमळे आधी पाकिस्तानचे खंदे समर्थक असलेल्या बुगटी यांनी बलुचिस्तानच्या स्वायत्तते साठी सशस्त्र संघर्ष सुरू केला. आधी अंतर्गत राज्यमंत्री , संरक्षण राज्यमंत्री व बलुचिस्तानचे राज्यपाल म्हणून काम केलेल्या बुगटी यांना शस्त्र उचलावे लागले . पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर पाकिस्तान विरुद्ध गनिमी युद्ध पुकारल्याचा व त्याचे नेतृत्व करत असल्याचा आरोप केला होता. बलुचिस्तानमध्ये लोकप्रिय असलेल्या या नेत्याचा ते लपले असलेल्या गुहेचे छत कोकोसळल्याने2006 मधे दुर्दैवी अंत झाला



