दिनांक:- २७/०७/२०२५
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धारणातील पाणी पातळी नियंत्रित करणेकरिता आज दिनांक २७/०७/२०२५ दुपारी २ वाजता धरण सांडव्यावरून नदीपात्रामध्ये २००० घनफूट प्रतिसेकंद प्रमाणे विसर्ग सोडणेत येणार आहे. नदीपात्रामधील पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे.
पावसाचे प्रमाण, पाण्याची आवक यानुसार विसर्ग वाढविणेत येणार आहे. नदीकाठावरील सर्व गावकरी, ग्रामस्थ, शेतकरी यांना याद्वारे विनंती की नदीपात्रमध्ये उतरू नये, नदीपात्रालगत असणारे साहित्य, जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणेत यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन दूधगंगा धरण येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता चेतन माने यांनी केले आहे.