spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeविज्ञान - तंत्रज्ञान'टोयोटा'ने रोबोटिक्स व ए.आय च्या चाचणीसाठी वसवले अद्ययावत गाव

‘टोयोटा’ने रोबोटिक्स व ए.आय च्या चाचणीसाठी वसवले अद्ययावत गाव

नवीन ए.आय., रोबोटिक्स व स्वयंचलित वाहन तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी जपानच्या सुप्रसिद्ध ‘टोयोटा ‘ कंपनीने जपान मधे स्पेशल सिटी निर्माण केली आहे. टोयोटा ही 1937 मधे स्थापन झालेली जपानची जगातील सर्वात मोठी म्हणजे वर्षाला 10 दशलक्ष म्हणजे 1 कोटी गाड्यांची निर्मीती करणारी मल्टीनॅशनल कंपनी आहे.

ही शहरासारखी रचना नागरिक, माहिती तंत्रज्ञान, उर्जा आणि उत्पादीत वस्तुंचे दळणवळण यामधे भविष्यात होणारे संभाव्य बदल लक्षात घेऊन केली आहे असे चेअरमन अकीओ टोयोदा यांनी सांगितले. एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमात असणारी ही संरचना आहे. संशोधक आणि तंत्रज्ञान याना ही रचना अधिक जवळ आणेल कारण चाचण्या घेण्याचे प्रत्यक्ष वातावरण एखाद्या ‘जिवंत भल्यामोठ्या प्रयोगशाळेप्रमाणे असेल असे ते म्हणाले. टोकीयो पासून 60 किमी अंतरावर असलेल्या ‘वोव्हन सिटी’चे एकूण क्षेत्रफळ 175 एकर येवढे असून त्यातील सर्व इमारती भूयारी मार्गानी एकमेकास जोडलेल्या आहेत.

स्वयंचलित वाहने, त्यांनी कोणत्याही मानवी मदतीशिवाय वाहने लोड करणे, विविक्षित ठीकाणी पोहोचवणे व उतरवणे व अशा सर्व ऑपरेशन्स मधे नागरिकांचा, यंत्रमानवांचा व स्वयंचलित वाहनांचा एकमेकावर होणारा परिणाम याचा येथे अभ्यास केला जाईल.

टोयोटा सध्या इलेक्ट्रीक वाहने उत्पादीत करत असून ऑटो सेक्टर साठीच्या आगामी प्रदुषण फ्री ‘हायड्रोजन इंधन प्रणाली’ची ही तयारी करत आहे.गुगलची ‘वायमो ‘, एलोन मस्कची ‘टेस्ला’ व इतर स्वयंचलित वाहनांच्या अग्रेसर उत्पादक कंपन्यांबरोबर टोयोटा स्पर्धेत आहे.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments