पूर्वी लोकांच्या जवळ पैसे कमी असायचे, आणि आता सारखी खाण्याची हॉटेल टपऱ्या खाऊगल्ल्या पाच पाच पावलांच्या अंतरावर नव्हत्या यामुळे आता सारखा वायफळ आणि गरज व भूक नसताना समोर दिसतंय म्हणून खाण्याचा ट्रेंड नव्हता. तसेच पूर्वी या गोष्टींना चैन व वायफळ खर्च म्हणून पाहिलं जातं होते तसे पण १५ ते २० वर्षा पूर्वी लोकांना नवीन काही खाणे म्हणजे वडा,भाजी,मिसळ,भेळ आणि दाक्षिणात्य पदार्थ आंबोळी,डोसा,उत्तपा,इडली अजून दोन चार पदार्थ इकडे तिकडे झाली. खाण्याच्या पदार्थाची लिस्ट तस बघितला तर यात जास्त प्रमाण पौष्टिक पदार्थांचेच किंवा रोज घरात खात असलेल्या साधनसामग्री पासून बनलेलेच पदार्थ त्यामुळे शरीराला अपायकारक किंवा वजन वाढीचा विषयचं नव्हता.त्यावेळी फॅमिलीला घेऊन हॉटेलला जाणे हा प्रकार क्वचितच होते किंवा फक्त उच्चं वर्गी्यांना परवडणारे होते. अप्पर मिडल क्लास आणि लोव्हर क्लास घरातच चिकन मटण आणून शिजवीत कारण त्यावेळी कुटुंबे ही मोठी होती सगळ्यांना घेऊन जाणे म्हणजे कमीत कमी 5 ते 8 लोकांना घेऊन जाणे घरच्या धन्याच्या खिश्याला परवडणारे नव्हते.


एका वेळच्या हॉटेल च्या जेवणात महिन्याभराचा राशन येई त्यावेळी नवीन असें खाणे म्हणजे नातेवाईकांच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाच्या वेळीच किंवा गल्लीतील मंडळाचा किंवा तालमीचा महाप्रसाद आणि कधी घरी पाहुणे आले तरच म्हणून लोकांचा महिन्याचा खर्च मोजून मापून असें ही झाली १५-२० वर्षांपूर्वी ची गोष्ट सध्या पावला पावलावर खायची दुकाने झालेत पिझ्झा बर्गर,शॉप चहाच्या टपऱ्या या मुळे लोक भूक नसताना ही फक्त टाईमपास म्हणून खातात. सोशल मीडिया युट्यूब, टीव्ही वरील जाहिरातींमुळे लोकांच्या खाण्याप्रती मानसिकता बदलली आहे. मोठं मोठ्या ब्रँडेड होटेल कॅफे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन त्याचे फोटो इन्स्टाग्राम फेसबुक ला टाकुण आपली फेक किंवा दिखाऊगिरीची सोशल इमेज जपण्याच्या नादात आपण काय खातोय भूक आहे नाही वेळ कोणती आहे, आपल्या महिन्याच्या बजेट मध्ये आजच खाण्याचे बिल बसत का याचा कुठे ही विचार होत नाही. भूक नसताना खाणे म्हणजे अन्न व पैसा वाया घालवणे च आहे. पार्टी मध्ये माणसांची आवड निवड लक्ष्यात न घेता मोठे तोंडकरून जेवण ऑर्डर देतो मग डिश डिश भरून आलेले पदार्थ त्यातील 60 ते 70% खाऊन उरलेलं टाकून देणे पैसा आणि अन्नाचे मात्रे करणे हेच आहे.


या सोशल मॉडिया मुळे लोक अन्न हे भुकेसाठी आहे हे विसरत चाललेले आहेत आज कालच्या सो कॉल्ड झेंझीज पिढीला असें वाटते की खाण हे प्रतिष्ठा दाखवायच माध्यम आहे. हल्ली होटल्स कॅफे मध्ये भेसळ युक्त पदार्थांचा वापर वाढला आहे. ओरिजिनल बटर च्या ऐवजी मारगारिण वापरला जातो. आइस्क्रीम मध्ये दुधा ऐवजी पाम तेल सारख्या पदार्थांचा वापर होत आहे. रोटी बनवन्यासाठी वापरला जाणारा अट्टा आता बदलला आहे. चिकन तर औषधे आणि स्टेरॉईड इंजेक्शन देऊन कोंबडयांचे उत्पादन केल जात त्या मुळे चिकन शिजवताना ते चिकन स्टॉक मध्ये उतरते तसेच ही इंजेक्शन कोंबड्याच्या पेंट दिलीजतात व आपण आवडीने लेगपिस चावून खाता ना त्याचा शिल्लक अंश आपल्या पोटात जातो या सगळ्या प्रकारांमुळे स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. म्हणून स्त्रियांमध्ये वंधीत्वचे प्रमाण वाढत आहे.अजून एक मला वाटणारे गमतीशीर कारण म्हणजे पूर्वी शौचालये घरा मध्ये नव्हती तर ती घराच्या मागच्या बाजूस थोड्या अंतरावर किवा शेता मध्ये जावे लगे म्हणून लोक खातान बेताने च खायची कारण पोट बिघडू नये आणि रात्री आप रात्री शौचास जायला लागू नये. म्हणजे एकंदरीत काय तर कळत नकळत पणे शिस्त लागून जाई आणि शरीराचे खाण्यापिण्याचे आणि शौचाचे वेळापत्रक बनत असे.काळ बदलला आणि संगळच बदलल.
सध्या असा माणूस क्वचितच सापडेल की ज्याला तुम्ही जर विचारले की तुला कडकडून भूक लागलेली आठवते का या आठवड्यात तुम्ही पण हा प्रश्न स्वतःला विचार तुमचे पान उत्तर ‘नाही‘ हेच येईल हीच शोकांतिका आहे. कारण समोर चांगले चमचमीत चटपटीत दिसत आहे. म्हणून खाणे,वेळ जात नाही म्हणून खाणे, पंचतारांकित पिक्चर च्या टॉकीज मध्ये आपली श्रीमंती दाखवण्यासाठी आणि मित्रमंडळी नातेवाईक यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी बारडी भरून पॉपकॉर्न घेऊन खाणे, गरज नसताना व वेळीआवेळी खाद्यपदार्थ घेऊन खाणं ही माझ्या मते एक प्रकारची मानसिक विकृतीच आहे. अशा वेळी स्वतः ला प्रश्न विचार मला खरच भूक लागली आहे का ? आणि जे खाणार आहे ते आरोग्यदाई आहे का की थोडी कळ काढल्यावर मी माझ्या इप्सित स्थळी पोहचून जेवणच जेऊ शकतो. हे केल्याने तुमच्या शरीराशी निगडीत प्रश्न सुटायला चालू होतील.एखाद्या दिवशी तुम्ही स्वतःला सूट देऊन माणूस म्हणून जन्मलो याचा आनंद घेऊ शकता आणि हव ते खाऊ शकता. म्हणून मला असे वाटते आपल्या खाण्या संबंधी च्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्या पैकी आपल्या मानसिक विकृती आणि अविवेकी बुद्धीच्या प्रभावाणेच येते.गोष्ट साधी सोपी आहे. महागडी फिटनेस बॅण्ड डायट प्लॅनर महागड्या जीम ची मेंबरशिप ही सर्व उपदव्याप करण्यापेक्षा ज्या वेळेला कडकडीत बूक लागेल तेव्हाच खाणे. आणि जोपर्यंत कडकडून भूक लागत नाही तो पर्यन्त वाट बघणे आणि भूक नसेल त्या वेळी खाण टाळणे भुके पेक्षा कमीच खाणे तुम्हाला त्याचे दोनच दिवसात परिणाम जाणवेल एवढाच साधा सोपा मंत्र आहे.