कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर महापालिकेने निलंबित केलेले शिक्षक गिरीश फोंडे यांचे निलंबन रद्द करावे म्हणून आज कोल्हापूरमधील शेकडो नागरिक रस्त्यावर आले..
एका शिक्षकासाठी शेतकरी आणि नागरिक भर उन्हात रस्त्यावर येणे ही अभूतपूर्व घटना आहे.
शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात भाग घेतला म्हणून
गिरीश फोंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने राजू शेट्टी यांसारखे नेते आणि नागरिक रस्त्यावर आले..
शिक्षक जर समाजाच्या प्रश्नाशी एकरूप झाला तर समाजही शिक्षकाच्या पाठीशी उभे राहतात हा यातील सांगावा मला खूप महत्वाचा वाटतो.
५० गावात दारुबंदी करणारा व अनेक सामाजिक आंदोलनात गिरीषने भाग घेतला म्हणून समाज आज त्याच्या पाठीशी आहे
शिक्षकांना समाज आदर देत नाही असे आज म्हटले जाते पण हे खरे नाही….जे शिक्षक चांगले काम करतात त्यांना खूप आदर आजही मिळतो.जे केवळ नोकरी करतात आणि कुटुंबाचा विचार करतात त्यांचा विचार समाजही करत नाही… हे लक्षात घ्यावे.
गिरीश साठी निघालेला हा मोर्चा शिक्षक आणि समाज नात्यात
महत्वाचा टप्पा आहे.
हेरंब कुलकर्णी






