कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात ४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार असून, कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी ज्या दिवशी जागा निश्चित होईल त्या दिवशी आयटी पार्कचा शासन निर्णय काढला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केली. उद्योगसंचालयामार्फत आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद २०२५ उद्घाटन प्रसंगी सामंत बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा साठी गुंतवणूक परिषद झाली त्यामध्ये उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामंजस कराराचे आदान प्रदान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उद्दिष्टपूर्ती व उल्लेखनीय काम केलेल्या विविध बँकर्सना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
उद्योग क्षेत्रात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून चार हजार कोटींचे करार करण्यात यशस्वी झाले आहे. उद्योग क्षेत्रावर ८० ते ८५ % गुंतवणूक करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून सामंत म्हणाले, राज्यात मेगा व अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणले आहेत. मागील वर्षापेक्षा तिप्पट गुंतवणूक उद्योग क्षेत्रात वाढली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सुमारे ४० हजार उद्योजक तयार झाले आहेत.
मध उत्पादकांना दरमहा १५ हजार रुपये मिळणार :
खादी ग्रामोद्योग विभाग विभागामार्फत शुद्ध मध निर्मितीला चालना दिली आहे. हे मध इतर कंपन्यांच्या ब्रँड पेक्षाही चांगले आहे. याच्या माध्यमातून मध उत्पादक शेतकऱ्यांना दरमहा किमान १५,००० रुपये उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली .
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सहकारी बँकांमधूनही कर्ज पुरवठा होण्याबाबत शासनाने निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आबिटकर यांनी केलि. त्यावर पंधरा दिवसात शासन निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम उद्दिष्ट पूर्तीची माहिती दिली. पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उद्योग व कृषीचे अध्यक्ष ललित गांधी, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील आदी उपस्थित होते.
या चार हजार कोटी रुपये यांचे करार झाले असून त्यात प्रामुख्याने एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड इंजिनिअरिंग १२५ कोटी, अरविंद पाटील इंडिया लिमिटेड टेक्स्टाईल १२५ कोटी, तेजस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड फाउंड्री उद्योग ११५ कोटी, नेक्स्ट लाईव्ह प्रायव्हेट लिमिटेड इंजीनियरिंग १०५ कोटी व अरिहंत टेक्समो स्पिन टेक्स्टाईल १०५ कोटी अशी उद्योग आणि गुंतवणूक केली आहे. सामान्य सकारांतर्गत येणाऱ्या वर्षभरात औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन गुंतवणूक तसेच काही नवीन प्रकल्प सुरू केले जाणार आहेत सध्या सुरू असलेल्या प्रकल्पाचे विस्तारीकरण केले जाणार आहे



