शेती व शेतकरी सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता जपानच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य घेणार आहे. जपानची M2 लॅबो ही जपानच्या ‘सुझुकी या नामांकीत कम्पनी ची शेतीविषयक शाखा आहे आणि ती आता मुंबईत आता रजिस्टर झाली आहे. या M2लॅबो व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त प्रकल्पातुन शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विडा पुन्हा उचलला आहे.
भारत शेतीप्रधान देश आहे व आपल्या देशातील 70% लोकसंख्येचा शेती हाच उत्पन्नाचा स्त्रोत आहे हेआपण अनेक वर्षे ऐकत, वाचत आलो आहोत. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या,सुलतानी, किंवा नैसर्गिक आसमानी आपत्ती मुळे शेतीचे होणारे नुकसान आपणा सर्वानाच अस्वस्थ करते.त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती सुधारुन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्याच्या प्रयत्नांची तातडीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकार जपानच्या तंत्रज्ञानाने शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नातआहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जपानचे M2 लॅबो कंपनीचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
भारत व जपान मधिल कुशल शेतीसाठी काम करणा-या संस्थाना एकत्र करुन, एआय चा वापर वाढवून शेतीच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे हे याचे उद्दिष्ट आहे.जपानी तंत्रज्ञान भारतीय शेतीच्या क्षेत्रात कृत्रिम बुदधीच्या सहाय्याने कोट्यावधी भारतीय शेतकऱ्यांना मदत करु शकतात.मातीचे पुनुरुज्जीवन,आदर्श शेतीची मॉडेल्स, हरीत ग्रुह तंत्रज्ञान यावर महाराष्ट्र सरकार M2 लॅबोसह काम करेल. शेती उत्पादनाच्या विपणनातील अनिष्ट पध्दतीतून सुटका करुन घेण्यासाठी शेतक-यां ना सामर्थ्य प्रदान केले जाइल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तसेच भारतीय शेतकर्याना प्रशिक्षण देऊन जपानमधे रोजगाराच्या संधिही उपलब्ध करुन दिल्या जातील असेही ते म्हणाले. यावेळी कम्पनीने जॅपनीज उत्कष्ट शेतीसाठी येथील संस्थासोबत काम करत ‘आदर्श केंद्र न्लबो गाव महाराष्ट्रात स्थापन करण्याची इच्चा व्यक्त केली. तसेच जुनियर गाव प्रकल्पात शेतकर्यान्चे उत्प न्न वाढवून तरुण वर्गासमोर करीअर वा रोजगार म्हणून शेती निवडण्यास प्राधान्य मिळावे असा प्रयत्न आहे.
याप्रसन्गी लॅबोचे मुख्य कार्यकारी अधिकारी युरीको केटो,समीर खाले, मित्र संघटनेचे अध्यक्ष प्रसुन अग्रवाल, लॅबो भारतशाखेचे डायरेक्टर देवांग ओझा आदी उपस्थित होते.